भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 59.1 कोटी डॉलरची वाढ
06:41 AM Feb 06, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 59.1 कोटी डॉलरची वाढ झाली आहे. ही माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. 26 जानेवारीला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताचा विदेशी चलन साठा 59.1 कोटी डॉलरने वाढून 616.733 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. 19 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 2.795 अब्ज डॉलरने घटला होता. 26 जानेवारीला संपलेल्या आठवड्यामध्ये विदेशी चलन मालमत्ता 28.9 कोटी डॉलरने वाढून 546.144 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. दुसरीकडे देशाचा सुवर्ण साठा 26.9 कोटी डॉलरने घटत 47.481 अब्ज डॉलरवर राहिला होता.
Advertisement
Advertisement
Next Article