For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूमध्ये भारताचा पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिअॅक्टर

06:45 AM Apr 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूमध्ये भारताचा पहिला  प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिअॅक्टर
Advertisement

सप्टेंबर 2026 पर्यंत कार्यान्वित होणार : 500 मेगावॅट क्षमता : अणु कचऱ्याचा पुनर्वापर करून वीजनिर्मिती करणार

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूतील कल्पक्कम येथील भारतातील पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिअॅक्टर (पीएफबीआर) पुढील वर्षी म्हणजेच सप्टेंबर 2026 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या अणुभट्टीमुळे देशाच्या तीन टप्प्यांच्या अणुप्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश अणुकचऱ्याचा पुनर्वापर करून वीजनिर्मिती करणे हा आहे. या अणुभट्टीची रचना इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राने (आयजीसीएआर) केली होती. या अणुभट्टीची क्षमता 500 मेगावॅट असून ती अंतिम टप्प्यात आहे.

Advertisement

भारत सरकारने 2003 मध्ये भारतीय न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडला अणुभट्टी-प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिअॅक्टर बांधण्यासाठी आणि चालवण्यासाठी मान्यता दिली होती. प्लुटोनियम-आधारित इंधन (मिश्रित ऑक्साईड) वापरणारी आणि थंड करण्यासाठी द्रव सोडियम वापरणारी ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे. यामध्ये सध्या वापरात असलेल्या प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्समधून मिळणारे इंधन देखील पुन्हा वापरले जाईल.

पुढील वर्षी वीजनिर्मिती अपेक्षित

या प्रकल्पातून 2025-26 पर्यंत वीजनिर्मिती सुरू होण्याची अपेक्षा आहे. मार्च 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रिअॅक्टर व्हॉल्टला आणि रिअॅक्टरच्या नियंत्रण कक्षाला भेट दिली होती. जुलै 2024 मध्ये अणुऊर्जा नियामक मंडळाने इंधन लोडिंग आणि प्रारंभिक चाचण्यांना मान्यता दिली होती. भारताच्या अणुप्रकल्पात पीएफबीआर खूप महत्त्वाची भूमिका बजावेल

Advertisement
Tags :

.