For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताची आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली ‘वनडे’ लढत

06:51 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
भारताची आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली ‘वनडे’ लढत
Advertisement

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

Advertisement

भारताचा दक्षिण आफ्रिकेविऊद्धचा सलामीचा एकदिवसीय सामना आज रविवारी वाँडरर्स येथे होणार असून युवा क्रिकेटपटूंसह एकदिवसीय सामन्यांच्या विश्वातील वाटचालीचा हा पहिला टप्पा असेल. आगामी टी-20 विश्वचषकाचा विचार करता या एकदिवसीय मालिकेला कितपत महत्त्व आहे असे वाटू शकते. परंतु ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025’च्या आधी. भारतासाठी आणि काही प्रमाणात दक्षिण आफ्रिकेसाठी देखील ही नवीन फळी आजमावून पाहण्याची संधी आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी गेल्या दीड दशकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठी मजल मारलेली आहेत. पण आता ते त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत आणि त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी तऊण भारतीय नावे सरसावणे आवश्यक आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व के. एल. राहुल करेल. येथील मालिकेत यश मिळविल्यास राहुलला दीर्घ कालावधीसाठी एकदिवसीय कर्णधारपद मिळू शकते.

Advertisement

राहुल, आजारातून सावरणारा ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर यांनी यापूर्वी आपला पराक्रम दाखविलेला आहे. ‘टी-20’मधील धडाकेबाज खेळाने सर्वांना प्रभावित करून सोडलेला रिंकू सिंगही आज एकदिवसीय सामन्यातं पदार्पण करू शकतो. काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरीव धावा जमविणारा रजत पाटीदार आणि तामिळनाडूतर्फे विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केलेला भारद्वाज साई सुदर्शन तसेच तिलक वर्मालाही मधल्या फळीत संधी मिळू शकते.

विश्रांती घेतलेला कागिसो रबाडा आणि जखमी अॅनरिक नॉर्टजे यांचा समावेश नसलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्यासमोर ही तऊण नावे टिकू शकतील, अशी आशा भारतीय संघ व्यवस्थापनाला असेल. भारताकडेही नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात प्रभावी ठरलेले जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे तीन वेगवान गोलंदाज नसतील.  बुमराह आणि सिराज कसोटी मालिकेत खेळणार आहेत, तर शमीला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने फिटनेस मान्यता न दिल्यामुळे दौऱ्यातून वगळण्यात आले आहे.

या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताच्या वेगवान माऱ्याची जबाबदारी आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर असेल. तिसऱ्या ‘टी-20’ लढतीत जोहान्सबर्गच्या खेळपट्टीने अनपेक्षितरीत्या फिरकीकडे झुकता कल दाखविला. आजही तशीच परिस्थिती राहिल्यास त्याचा लाभ घेण्यासाठी भारताकडे कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यजुवेंद्र चहल हे तीन अनुभवी फिरकीपटू आहे. ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरलाही संधी दिली जाऊ शकते, जो वरच्य फळीत फलंदाज म्हणूनही कामी येऊ शकतो. राखीव यष्टिरक्षक म्हणून घेतलेल्या संजू सॅमसनला एखाद दुसऱ्या लढतीत संधी मिळण्याची अपेक्षा असेल.

संघ-भारत : के. एल. राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, आकाश दीप.

दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, डेव्हिड मिलर, वायन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, कायल वेरेन, लिझाद विल्यम्स.

सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा.

Advertisement
Tags :

.