कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताची पहिली एआय ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर

06:19 AM Jun 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भेटा राधिका सुब्रमण्यमला, करविणार देशभराची सैर

Advertisement

कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्क नावाच्या कंपनीने देशातील पहिली एआय ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर निर्माण केली आहे. तिचे नाव राधिका असून तिला कधीच सुटी नको आणि तिचा पासपोर्ट देखील नाही. दरवेळी प्रवासात असणारी राधिका तमिळ आणि इंग्रजीत संभाषण करू शकते. तिला भारताच्या प्रत्येक हिस्स्यात फिरून तेथील संस्कृती आणि ओळखीशी निगडित कहाण्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याकरता निर्माण करण्यात आले आहे. ही भारताची पहिली एआय ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर आहे. तुम्ही विविध ट्रॅव्हल व्लॉगर्सचा कंटेंट पाहत होतात, आता तुमच्या यादीत राधिकाचे नावही जोडले गेले आहे.

Advertisement

जेन झेडसाठी निर्मित

राधिकाला जेन झेडला केंद्रस्थानी ठेवून निर्माण करण्यात आले आहे. सद्यकाळातील युवा मोकळ्या विचारांचे अन् स्वत:चे निर्णय घेणारे असतात, तसाच काहीसा अनुभव राधिकाला पाहताना मिळणार आहे. यापूर्वी या कंपनीने काव्या नावाच्या एआयलाही लाँच केले आहे. याचे काम मिलेनियल्ससाठी लक्झरी आणि स्टायलिश लाइफस्टाइल प्रमोट करणे होते. तर राधिका सोलो ट्रॅव्हलरप्रमाणे सादर करण्यात आली आहे. राधिकाची पार्श्वभूमी तिने देशभरात फिरण्यासाठी एक सुरक्षित कॉर्पोरेट नोकरी सोडल्याची दाखविण्यात आली आहे. आता ती वेगवेगळ्या ठिकाणी जात तेथील कहाण्या आणि संस्कृती लोकांपर्यंत पोहोचविते.

स्वरूप...

ही कॉम्प्युटरद्वारे निर्माण करण्यात आलेली एक व्यक्तिरेखा आहे, जी एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या मदतीने तयार करण्यात येते. याच्या निर्मितीत जनरेटिव्ह डिझाइन, मशीन लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग यासारख्या तंत्रज्ञानांचा वापर होतो. अशाप्रकारच्या व्यक्तिरेखांची एक खास बाब म्हणजेच त्यांची स्वत:ची पर्सनालिटी, बॅकस्टोरी आणि बोलण्या-लिहिण्याची खास शैली असते. याचे काम सोशल मीडियावर अनुभव पोस्ट करणे, लोकांशी बोलणे आणि कुठलेही ठिकाण किंवा प्रॉडक्टचे प्रमोशन करणे असते. हेच काम जगात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर करतात. 2023 मध्ये जर्मनीने इम्मा नावाच्या  एआय ट्रॅव्हल अॅम्बेसिडरला लाँच केले होते. इम्माच्या व्यक्तिरेखेची कहाणी ती  तरुण आणि उत्साही व्हर्च्युअल ट्रॅव्हलर असून ती 20 भाषा बोलू शकते आणि जगभरातील लोकांना जर्मनी फिरण्यासाठी डिजिटल पद्धतीने प्रेरित करणारी आहे.

लोकांशी जोडण्याची नवी पद्धत

राधिका आमच्या मित्राप्रमाणे वाटते. ती मुक्त विचारांची आणि जगाला जाणून घेण्यास रुची बाळगणारी आहे. आम्ही केवळ एआय इन्फ्लुएंसर निर्माण करू इच्छित नव्हतो. भारताची कहाणी लोकांपर्यंत आकर्षक शैलीत पोहोचविणारी व्यक्तिरेखा रचण्याची इच्छा होती. राधिकाची सर्वात मोठी शक्ती तिची कहाणी ऐकविण्याची कला आहे, जी तिला उर्वरित इन्फ्लुएंसर्सपेक्षा वेगळे स्वरुप देते असा दावा कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्कचे संस्थापक विजय सुब्रमण्यम यांनी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article