फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था / ब्रिटेनी (फ्रान्स)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या उन्नती हुडाला दुसऱ्या फेरीत तर मिश्र दुहेरीमध्ये रोहन कपूर-ऋत्विका ग•s तसेच महिला दुहेरीत कवीप्रिया सेल्व्हम-सिमरन सिंग यांच्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात चीनच्या 18 वर्षीय व्हेंग झेईने भारताच्या उन्नती हुडाचा 21-14, 21-11 असा फडशा पाडत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत महिला एकेरीची पहिली फेरी पार करणारी उन्नती ही एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे. चीनच्या झेईने हा सामना केवळ 39 मिनिटांत जिंकला.
मिश्र दुहेरी प्रकारात थॉम गिक्वेल आणि डेल्फीनी डिलेरु या जोडीने भारताच्या रोहन कपूर आणि ऋत्विका ग•s यांचा 23-21, 8-21, 21-17 असा पराभव केला. महिला दुहेरीमध्ये भारताच्या कवीप्रिया सेल्व्हम आणि सिमरन सिंग यांना द. कोरियाच्या जेयाँग आणि याँग यांनी 21-7, 21-9 असे केवळ 34 मिनिटांत पराभूत केले. या स्पर्धेमध्ये भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना पुरूष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत हारपत्करावी लागली. भारताच्या लक्ष्य सेनला पुरूष एकेरीमध्ये पहिल्याच फेरीत आयर्लंडच्या नेगुयनने पराभूत केल्याने भारताचे या स्पर्धेतील एकूण आव्हान संपुष्टात आले.