For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताच्या मोहिमेला आज न्यूझीलंडविरुद्ध लढतीने प्रारंभ

06:44 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताच्या मोहिमेला आज न्यूझीलंडविरुद्ध लढतीने प्रारंभ
Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

आज शुक्रवारी येथे महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील ‘अ’ गटातील सलामीच्या सामन्यात भारत न्यूझीलंडचा सामना करेल त्यावेळी भूतकाळातील आठवणी पुसून टाकून दमदार सुऊवात करण्याचा संघाचा उद्देश राहील. त्यासाठी वरिष्ठ स्टार्सचा उत्कृष्ट प्रयत्न करावा लागेल.

कर्णधार हरमनप्रीत कौरची ही शेवटची टी-20 विश्वचषक स्पर्धा ठरण्याची शक्यता असून 2020 मध्ये मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविऊद्ध भारताने पत्करलेल्या पराभवासह अनेक चुकलेल्या आणि निराशाजनक क्षणांची ती साक्षीदार राहिलेली आहे. मात्र ही भारतीय फळी प्रतिभेने समृद्ध आहे आणि केवळ ऑस्ट्रेलियाकडेच इतका प्रभावी संघ आहे.

Advertisement

भारत आज ज्यांचा सामना करेल तो न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाइतका दमदार प्रतिस्पर्धी नाही. पण दोनवेळा उपविजेता राहिलेला हा संघ चिवट आहे. त्यामुळे त्यांच्याविऊद्धचा विजय हा संघ रणनीती आणि मानसिकदृष्ट्या सुस्थितीत असण्याचे चिन्ह मानले जाऊ शकते. भारताला त्यांच्या अव्वल खेळाडूंकडून म्हणजे 35 वर्षीय हरमनप्रीत, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्याकडून मोठ्या योगदानाची आवश्यकता असेल.

भारताने मोठी मजल मारण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण आहे. कारण संयुक्त अरब अमिरातीतील खेळपट्ट्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे धावा काढणे तिथे कठीण बनू शकते. खास करून स्पर्धा जसजशी पुढे जाईल तसतसे ते अधिक कठीण होऊ शकते. तथापि खेळपट्टीवर परिणाम होणे एक प्रकारे भारताच्या गोलंदाजी विभागातील सामर्थ्यासाठी म्हणजे फिरकी माऱ्यासाठी अनुकूल ठरेल. पण किवीजकडे अनुभवी आणि तऊण खेळाडूंचा चांगला मिलाफ आहे, जे त्यांना अशा अडथळ्यांतून वर काढू शकतात. यात कर्णधार सोफी डेव्हाईन, अनुभवी अष्टपैलू सुझी बेट्स आणि अनुभवी वेगवान गोलंदाज ली ताहुहू आणि लेह कॅस्परेक यांचा समावेश होतो.

संघ-भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया (तंदुरुस्तीवर अवलंबून), पूजा वस्त्रकार, अऊंधती रे•ाr, रेणुका सिंह ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील (तंदुरुस्तीवर अवलंबून), सजना सजीवन. राखीव : उमा चेत्री, तनुजा कंवर, सायमा ठाकूर.

न्यूझीलंड : सोफी डिव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, इझी गेझ, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, अॅमेलिया केर, जेस केर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोवे, ली ताहुहू .

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.