भारताच्या मोहिमेला पराभवाने प्रारंभ
न्यूझीलंडचा 58 धावांनी विजय, सोफी डिव्हाईन सामनावीर, रोजमेरी मायरचे 4, ताहुहूचे 3 बळी
वृत्तसंस्था / दुबई
2024 च्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाच्या मोहिमेला पराभवाने प्रारंभ झाला. न्यूझीलंडने भारताचा 6 चेंडू बाकी ठेवून 58 धावांनी पराभव केला. 36 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 57 धावा झळकविणाऱ्या कर्णधार सोफी डिव्हाईनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या स्पर्धेतील हा चौथा सामना होता. अ गटातील या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकात 4 बाद 160 धावा जमविल्यानंतर भारताचा डाव 19 षटकात 102 धावांत आटोपला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या सुझी बेट्सने 24 चेंडूत 2 चौकारांसह 27, प्लिमरने 23 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 34, अॅमेलिया केरने 22 चेंडूत 13 धावा जमविल्या. कर्णधार डिव्हाईनने शानदार नाबाद अर्धशतक झळकविले. हॅलिडेने 12 चेंडूत 2 चौकारांसह 16 तर ग्रीनने 3 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 5 धावा केल्या. बेट्स आणि प्लिमर यांनी 46 चेंडूत 67 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रे•ाrने बेट्सला तर शोभनाने प्लिमरला पाठोपाठ बाद केले. रेणुका सिंगने अॅमेलिया केरला वस्त्रकारकरवी झेलबाद केले. हॅलिडे आणि डिव्हाईन यांनी चौथ्या गड्यासाठी 46 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडने पॉवरप्लेच्या 6 षटकात 55 धावा जमविल्या. न्यूझीलंडचे अर्धशतक 34 चेंडूत तर शतक 88 चेंडूत आणि दीडशतक 115 चेंडूत नोंदविले. डिव्हाईनने अर्धशतक 32 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने झळकविले. न्यूझीलंडच्या डावात 1 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे रेणुका सिंगने 2 तर रे•ाr, शोभना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर भारतीय संघाच्या डावाला सुरुवातीपासूनच गळती लागली. भारताचे फलंदाज ठराविक अंतराने चुकीचे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. भारतीय संघातील एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. सलामीच्या मानधनाने 2 चौकारांसह 12, कर्णधार हरमनप्रित कौरने 2 चौकारांसह 15, रॉड्रिग्सने 1 चौकारांसह 13, रिचा घोषने 12 तर दीप्ती शर्माने 13 धावा जमविल्या. भारताच्या डावामध्ये अवांतर 13 धावा मिळाल्या. न्यूझीलंडतर्फे रोजमेरी मायर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 19 धावांत 4 तर कार्सनने 34 धावांत 2 तसेच ताहुहूने 15 धावांत 3 गडी बाद केले. अॅमेलिया केरने 19 धावांत 1 बळी मिळविला. भारताच्या डावात 7 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवरप्लेच्या 6 षटकात 43 धावा जमविताना 3 गडी गमविले. भारताचे अर्धशतक 46 चेंडूत तर शतक 109 चेंडूत फलकावर लागले. भारताची 10 षटकाअखेर स्थिती 4 बाद 63 अशी होती.
संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड 20 षटकात 4 बाद 160 (डिव्हाईन नाबाद 57, प्लिमर 34, बेट्स 27, केर 13, हॅलिडे 16, ग्रीन नाबाद 5 अवांतर 8, रेणुका सिंग 2-27, रे•ाr आणि शोभना प्रत्येकी 1 बळी), भारत: 19 षटकात सर्वबाद 102 (हरमनप्रित कौर 15, रॉड्रिग्स 13, स्मृती मानधना 12, घोष 12, दीप्ती शर्मा 13, वस्त्रकार 8, शोभना नाबाद 6, अवांतर 13, मायर 4-19, ताहुहू 3-15, कार्सन 2-34, केर 1-19)