महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारताच्या मोहिमेला आज आयर्लंडविरुद्धच्या लढतीने प्रारंभ

06:51 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

सुपरस्टार क्रिकेटपटूंचा समावेश असलेला भारतीय संघ आज आयर्लंडविऊद्धच्या लढतीने टी-20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.  संघाला आहे की, ड्रॉप-इन खेळपट्टीवर सर्वोत्तम संघरचना कोणती असू शकते याबद्दल अजूनही बराच गोंधळ आहे. मात्र आतापर्यंतच्या खेळावरून हे स्पष्ट झाले आहे की, गेल्या काही महिन्यांत इंडियन प्रीमियर लीगमध्ये जसे धावांचे डोंगर उभे झाले तसे येथे घडणार नाही.

Advertisement

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा विश्वचषक उचलणाऱ्या संघात समावेश राहिलेला आहे. परंतु जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्यासह इतर काही क्रिकेटपटू चषक उचलण्यास उत्सुक असतील. सध्याची तुकडी अंतिम दोन अडथळ्यांमध्ये बऱ्याच वेळा अपयशी ठरली आहे. 37 व्या वर्षी रोहितची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा असे म्हटले जाऊ शकते. भारतात होणाऱ्या पुढील टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आणि 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणार असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी तो उपलब्ध नसणार हे स्पष्ट आहे.

पॉल स्टर्लिंग, जोश लिटल, हॅरी टेक्टर, अँडी बालबिर्नी यांसारख्या दर्जेदार टी-20 खेळाडूंसह एक अतिशय साहसी आयरिश संघ भारताशी भिडण्याची वाट पाहत आहे. नासाऊ काउंटीच्या संथ खेळपट्टीवर आणि कमी दर्जाच्या आउटफिल्डवर भारतीय संघ आयरिश डावखुरा फिरकीपटू जॉर्ज डॉकरेलविऊद्ध कसा खेळतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. आयरिश संघाच्या तुलनेत भारताकडे निश्चितच अधिक दर्जेदार फिरकीपटू आहेत. मात्र बुमराह वगळता वेगवान मारा मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत काहीसा कमकुवत दिसत आहे.

कर्णधार रोहित आणि कोहलीचा समावेश करायचा असल्याने कदाचित यशस्वी जैस्वालला बाहेर बसवावे लागेल. सराव सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रिषभ पंतची फलंदाजी दिलासा देणारी होती आणि हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीतील फॉर्मवरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. सोमवारी कँटियाग पार्क नेटमध्ये पंड्याने कोहली, सूर्यकुमार यादव आणि रोहितला गोलंदाजी करण्यात बराच वेळ घालवला. जर तो रोज किमान तीन षटके टाकू शकला, तर भारतीय संघ शिवम दुबेला खेळवण्याचा विचार करू शकतो आणि अतिरिक्त फिरकीपटूचा समावेश करू शकतो.

आयर्लंड टी-20 मध्ये अगदीच कमकुवत संघ नाही आणि अगदी अलीकडेच त्यांनी पाकिस्तानला त्यांच्या भूमीत पराभूत केलेले आहे. लिटलला गुजरात टायटन्सतर्फे आयपीएल खेळण्याचा काही प्रमाणात अनुभव आहे आणि बलबिर्नी, स्टर्लिंग आणि टेक्टर हे त्रिकूटही चांगले योगदान देऊ शकते.

 सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार रात्री 8 वा.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article