इस्रायल, इराणचा प्रवास भारतीयांनी टाळावा!
मध्यपूर्वेतील तणावादरम्यान केंद्र सरकारक#tarunडून सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेश मंत्रालयाने इराण आणि इस्रायलसंबंधी प्रवासविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व भारतीयांना पुढील माहितीपर्यंत इराण किंवा इस्रायलचा प्रवास न करण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. तसेच इराण आणि इस्रायलमध्ये असलेल्या भारतीयांना भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा आणि स्वत:ची नोंदणी करण्याचे आवाहन विदेश मंत्रालयाने शुक्रवारी केले आहे.
विदेश मंत्रालयाने शुक्रवारी एक अधिसूचना जारी करत भारतीयांना पुढील सूचनेपर्यंत इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्यास सांगितले आहे. इराण पुढील 48 तासांमध्ये इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात येत आहे.
इराण आणि इस्रायलमध्ये राहत असलेल्या भारतीयांनी स्वत:च्या सुरक्षेविषयी अत्याधिक खबरदारी बाळगावी आणि स्वत:च्या हालचालींचे प्रमाण कमीतकमी ठेवावे असे मंत्रालयाने म्हटले आहे.
इस्रायलवर इराणकडून हल्ला शक्य
इराण पुढील 48 तासांमध्ये इस्रायलवर हल्ला करू शकतो असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलकडून देण्यात आले आहे. इराणमधील आयआरजीसी या सैन्यदलाने देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासमोर संपर्क साधत इस्रायलच्या हितसंबंधांवर हल्ला करण्याचा पर्याय ठेवला होता. इराण इस्रायलवरील हल्ल्याच्या राजनयिक जोखिमींचे आकलन करत असल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने नमूद केले आहे. सीरियात इराणच्या वाणिज्य दूतावासाच्या एका इमारतीनजीक इस्रायलने एअरस्ट्राइक केल्यावर दोन्ही देशांमधील तणाव टोकाला पोहोचला आहे.
इस्रायलकडूनही तयारी
इस्रायलच्या हल्ल्यात इराणचा वरिष्ठ सैन्य कमांडर आणि 6 अधिकारी मारले गेले होते. तर गाझामध्ये सुरू असलेल्या सैन्य मोहिमेदरम्यान ‘अन्य क्षेत्रांमध्ये बदलल्या स्थिती’ची तयारी करत आहोत. आम्ही रक्षण आणि हल्ले या दोन्ही प्रकरणी इस्रायलच्या सुरक्षा गरजा पूर्ण करण्याची तयारी करत आहोत असे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी म्हटले