कॅनडात सुरक्षित नाहीत भारतीय !
नव्या उच्चायुक्तांनी उपस्थित केला प्रश्न : मला स्वत:च सुरक्षेची आवश्यकता
वृत्तसंस्था/ ओटावा
मोठ्या संख्येत भारतीयांना कॅनडामधून निघून जाण्यास भाग पाडले जात आहे. अशास्थितीत आता कॅनडातील भारताच्या नव्या उच्चायुक्ताने या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय नागरिक कॅनडात स्वत:ला सुरक्षित मानत नसल्याचे उच्चायुक्त दिनेश के. पटनायक यांनी म्हटले आहे. मला स्वत:ला येथे सुरक्षेची आवश्यकता जाणवत आहे. काही कॅनेडियन अशाप्रकारची समस्या निर्माण करत आहेत. ही भारतीयांची समस्या नव्हे तर कॅनडाची समसया असल्याचे त्यांनी नमूद पेले आहे. काही लोकांचा समूह प्रत्यक्षात भय निर्माण करत असल्याने भारत-कॅनडा संबंधांवरही प्रभाव पडत आहे असे पटनायक यांनी कुठल्याही खलिस्तानी दहशतवादी गटाचा नाव न घेता म्हटले आहे.
मागील काही काळात मोठ्या संख्येत भारतीयांना कॅनडातून बाहेर काढण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार 2024 मध्ये 1997 भारतीयांना कॅनडामधून बाहेर काढण्यात आले आहे. तर 2019 मध्ये ही संख्या केवळ 625 इतकी होती.
सातत्याने वाढतेय संख्या
जुलै 2025 पर्यंत 1,891 भारतीयांना कॅनडा सोडण्यास सांगण्यात आले होते. यातून चालू वर्षातील आकडेवारी मागील वर्षाच्या आकड्यापेक्षा अधिक राहणार असल्याचे स्पष्ट होते. कॅनडा स्वत:च्या स्थलांतरविरोधी धोरणाकरता अमेरिकेचे अनुकरण करत आहे. विदेशी गुन्हेगारांना देशातून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याची योजना असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अलिकडेच म्हटले होते. भारत आणि कॅनडाने ऑगस्ट महिन्यातच परस्परांच्या देशात उच्चायुक्त नियुक्त केले होते.