For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय सहन करतोय मर्यादेहून अधिक तापमान; संशोधनातून समोर आली बाब

06:44 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय सहन करतोय मर्यादेहून अधिक तापमान  संशोधनातून समोर आली बाब
Advertisement

भारतीय हवामान विभागाने पहिल्यांदाच 27 मार्च रोजी राजस्थानच्या काही हिस्स्यांमध्ये उष्मालाटेची घोषणा केली हीत. परंतु देशात ह्युमिड हीटवेव्हवरून कुठलाच अलर्ट जारी केला जात नव्हता. हवामान विभाग उष्मालाटेच्या घोषणेत रिलेटिव्ह ह्युमेडिटीला सामील करत नाही.

Advertisement

देशात ह्युमिड हीटवेव्हचे प्रमाण आणि तीव्रता सातत्याने वाढत आहे. हवामान विभाग हीटवेव्हची घोषणा मैदानी भागांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, किनारी भागांमध्ये 37 अंश सेल्सिअसपेक्षा आणि पर्वतीय भागांमध्ये 30 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान झाल्यावर करत असते. या आकडेवारीला हवामान विभागानेच निश्चित केले आहे.

Advertisement

तापमान सलग दोन दिवसांपर्यंत सरासरीपेक्षा 4.5 अंश सेल्सिअसने अधिक राहिल्यास हवामान विभाग कुठल्याही स्थानी उष्मालाटेची घोषणा करतो. परंतु तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झालयावर हवामान विभाग सर्वत्र उष्मालाटेची घोषणा करतो. परंतु यात आर्द्रतायुक्त उष्मालाटेला सामील करत नाहीत.

ह्युमिड हीटवेव्ह म्हणजेच आर्द्रतायुक्त उष्मालाटेच्या घटना देशात सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत मानवी शरीर, प्राण्यांचे शरीर किंवा वृक्ष जितके तापमान सहन करत असतात, ते प्रत्यक्षात अत्यंत अधिक असते. यंत्रात पारा कमी दिसतो, परंतु शरीरावर उष्णता अधिक प्रमाणात जाणवत असते. कारण वातावरणात आर्द्रता वाढलेली असते.

तापमान आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटीची एकत्र गणना केल्यावर वेट बल्ब टेम्परेचर किंवा अन्य निश्चित स्थानी हीट इंडेक्स मिळविता येऊ शकतो. यामुळे तापमान आणि आर्द्रतायुक्त उष्मालाटेसंबंधी कळू शकणार आहे.

वेट बल्ब टेम्परेचरमध्sय सर्वात कमी तापमान हवेमुळे थंड होते. हवा पाण्यातून निघणाऱ्या बाष्पामुळे थंड होते, ते देखील एका निश्चित दाबावर. शरीरातून सातत्याने घाम येऊ लागतो, जेव्हा तापमान अत्यंत अधिक वाढते, तेव्हा घामच मानवी शरीराला सुरक्षित ठेवतो. परंतु तापमान अधिक झाल्यावर थंड होण्याची प्रक्रिया मंदावू लागते. यामुळे मानवी शरीराचा समतोल बिघडू लागतो. अशा स्थितीत हीट स्ट्रोक किंवा मृत्यूचा धोका उद्भवतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेट बल्प टेम्परेचरची मर्यादा 30 ते 35 अंश सेल्सिअस आहे. याहून अधिक याचा आकडा गेल्यास मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.

Advertisement
Tags :

.