महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय कुस्ती महासंघच ‘चितपट’

06:58 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्रीडा मंत्रालयाकडून ‘डब्ल्यूएफआय’ बरखास्त  : नवे अध्यक्ष संजय सिंह यांची मान्यता रद्द

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

गेल्या 11 महिन्यांपासून वादांनी वेढलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची (‘डब्ल्यूएफआय’) नवी कार्यकारिणी क्रीडा मंत्रालयाने रविवार, 24 डिसेंबर रोजी बरखास्त करण्याची मोठी घोषणा केली. तीन दिवसांपूर्वी 21 डिसेंबर रोजी ‘डब्ल्यूएफआय’ निवडणुका झाल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे नवीन अध्यक्ष झाले होते. आता अध्यक्ष म्हणून त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. ‘डब्ल्यूएफआय’ने उत्तर प्रदेशातील गोंडा येथे ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप आयोजित केल्यानंतर मंत्रालयाने ही कारवाई केली.

भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले आणि कुस्तीपटू अनिता शेओरान यांचा पराभव झाला. या निवडणुकीनंतर पुन्हा वादाची ‘दंगल’ पुन्हा सुरू झाली होती. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीची वर्णी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी लागल्याने कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर बजरंग पुनिया आणि आणि ‘गुंगा पैलवान’ विरेंद्र सिंह यादव या दोघांनी आपले पद्म पुरस्कार सरकारजमा करण्याची घोषणा केली होती. यावरून राजकारण तापल्यानंतर मोदी सरकारने तडकाफडकी कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. कुस्तीपटूंच्या आक्रमक पवित्र्याचा मुद्दा सरकारवर बुमरँग झाल्याचे समोर आल्यानंतर नवी कुस्ती संघटना निलंबित करण्यात आली आहे. हे पाऊल डॅमेज कंट्रोल असल्याचे विरोधकांकडून म्हटले जात आहे.

संजय सिंह यांनी घेतलेले निर्णय रद्द

नवीन अध्यक्षांच्या विजयानंतर ‘डब्ल्यूएफआय’ने 28 डिसेंबरपासून उत्तर प्रदेशातील गोंडा येथे ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली होती. गोंडा हा भाजप खासदार ब्रिजभूषण यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. कुस्ती संघटना निलंबित करतानाच क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगितीही दिली आहे. यासोबतच पुढील आदेश येईपर्यंत सर्व कामांवर बंदी घालण्यात आली आहे. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. नवीन ‘डब्ल्यूएफआय’ संघाविऊद्ध क्रीडा मंत्रालयाच्या कारवाईमागे हे कारण असल्याचे मानले जात आहे.

नाराज कुस्तीपटूंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयावर साक्षी मलिकची आई कृष्णा मलिक हिने आनंद व्यक्त केला आहे. माझी मुलगी कुस्तीतून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करेल, असे स्पष्ट केले. याशिवाय कुस्तीपटू पंतप्रधानांच्या घराबाहेर स्वत:चा पद्मश्री पुरस्कार नेऊन ठेवणाऱ्या बजरंग पुनियाने हा सन्मान मागे घेणार असल्याचे म्हटले आहे. क्रीडा मंत्रालयाच्या कारवाईवर बोलताना ‘सरकारने डब्ल्यूएफआय बरखास्तीचा निर्णय घेतला असेल तर तो अगदी योग्य आहे. आपल्या बहिणी आणि मुलींच्या बाबतीत घडलेल्या घटना मन:स्ताप करणाऱ्या होत्या. अशा लोकांना सर्व महासंघातून काढून टाकले पाहिजे.’ असे बजरंग पुनिया म्हणाला.

निलंबन कारवाईमुळे संजय सिंह यांना धक्का

संजय सिंह यांनी क्रीडा मंत्रालयाच्या कारवाईवर आश्चर्य व्यक्त केले. क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. पण या निर्णयाचे मला आश्चर्य वाटते. याबाबत मी क्रीडा मंत्रालयाला विचारणार आहे. मी कुठेही कुस्तीपटूंचा अपमान केलेला नाही. मी गोंडा जिह्यातील नंदनी नगर स्पोर्ट्स स्टेडियम येथे 3 दिवसीय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते, जेणेकरून 15 वर्षांखालील आणि 20 वर्षांखालील मुलांचे वर्ष वाया जाऊ नये आणि त्यांना कुस्ती स्पर्धेत भाग घेता येईल, असे संजय सिंह म्हणाले.

ब्रिजभूषण सिंह ‘धोबीपछाड’

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कारवाईच्या मुद्द्यावर सावध भूमिका घेतली आहे. या प्रकरणाबाबत सध्या आपल्याकडे कोणतेही विधान नाही. मला क्रीडा मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. क्रीडा मंत्रालयाशी बोलताच तुम्हा लोकांना माहिती दिली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच या प्रकरणावर पहिल्या दिवसापासून राजकारण केले जात आहे. यामध्ये काँग्रेस आणि तुकडे-तुकडे गँगचा सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ब्रिजभूषणनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट

संजय सिंह यांच्या निलंबनानंतर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. न•ा यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी संजय सिंह आपले नातेवाईक नसल्याचे सांगितले. कुस्ती महासंघाबाबत जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निवडून आलेले लोकच घेतील. सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले.

कुस्ती महासंघ चालविण्यासाठी सुकाणू समिती गठित होणार

कुस्ती महासंघ चालविण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना 24 तासांच्या आत सुकाणू समिती स्थापन केली जाणार आहे. ही तीन सदस्यीय समिती असून त्यामध्ये एका महिलेचाही समावेश असेल. क्रीडा मंत्रालयाने रविवारी भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केल्यानंतर या समितीच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली आहे. कुस्ती महासंघ चालवण्यासाठी अशी समिती स्थापन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावषी एप्रिलमध्येही कुस्तीपटूंच्या विरोधामुळे दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. आयओए कार्यकारी परिषदेचे सदस्य भूपेंद्र सिंग बाजवा आणि असोसिएशनच्या उत्कृष्ट खेळाडू सुमा शिरूर यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article