भारतीय मल्लांची निराशा
वृत्तसंस्था / अमान (जॉर्डन)
येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात भारताच्या मल्लांनी शनिवारी निराशजनक कामगिरी केली. सुजित कालकल हा एकमेव मल्ल वगळता बाकीच्या भारतीय मल्लांनी निराशा केली.
पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल वजन गटात सुजितने सलामीच्या लढतीत पॅलेस्टीनीच्या असापचा तांत्रिक गुणांवर पराभव केला. त्यानंतर पुढच्या लढतीमध्ये जपानच्या केसाई तेनाबे याच्याकडून त्याला हार पत्करावी लागली. आता रिपचेजद्वारे सुजितला पुन्हा पदक लढतीसाठी प्रयत्न करावे लागतील. अन्य एका लढतीमध्ये भारताच्या विशाल कालीरमनला मंगोलीयाच्या ओचीरकडून हार पत्करावी लागली. ओचीरने विशालचा 8-0 असा एकतर्फी पराभव केला. अमन सेरावतच्या गैरहजेरीत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चिरागला 57 किलो वजन गटातील लढतीत अल्माजकडून पराभव पत्करावा लागला. या लढतीत चिरागला एकही गुण मिळवता आला नाही. 79 किलो गटात भारताच्या चंद्रमोहनला ताजीकस्थानच्या इव्हेलोव्हकडून पराभव पत्करावा लागला.