कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय महिलांचे उझ्बेकविरुद्ध दोन मित्रत्वाचे सामने

06:22 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
The Abha Football Federation said that the Indian senior women's football team will play an international friendly match against
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताच्या वरिष्ठ महिला फुटबॉल संघाची उझ्बेकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय मित्रत्वाची लढत मे-जूनमध्ये आयोजित करण्यात आली असल्याचे अभा फुटबॉल फेडरेशनने सांगितले.

Advertisement

उझ्बेकविरुद्ध होणारे हे दोन सामने 30 मे व 3 जून रोजी बेंगळूरमधील पदुकोन द्रविड सेंटर ऑफ स्पोर्ट्स एक्सलन्स येथे खेळविले जातील. क्रिस्पिन चेत्री यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघ सध्या एएफसी महिला आशियाई चषक 2026 पात्रता लढतीची तयारी करीत आहे. 1 मे पासून त्यांचे सराव शिबिर बेंगळूरमध्ये आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश असून याच गटात मंगोलिया (23 जून), तिमोर लेस्ट (29 जून), इराक (2 जुलै) व यजमान थायलंड (5 जुलै) यांचाही समावेश आहे. चियांग माइ येथे सामने होतील.

फिफा महिलांच्या मानांकनात भारतीय संघ 69 व्या स्थानावर असून 50 व्या मानांकित उझ्बेकविरुद्ध यापूर्वी 13 लढती झाल्या आहेत. त्यापैकी 9 सामने उझ्बेकने जिंकले तर भारताने केवळ एक सामना जिंकला आहे. उर्वरित तीन सामने अनिर्णीत राहिले आहेत. मित्रत्वाच्या सामन्यासाठी निवडलेला भारतीय संभाव्य महिला संघ : गोलरक्षक-पायल बसुदे, इलांगबम पन्थोई चानू, केइशम मेलोडी चानू, मोइरंगथेम मोनालिशा देवी. बचावफळी-पूर्णिमा कुमारी, पी. निर्मला देवी, मार्टिना थॉकचोम, शुभांगी सिंग, संजू, मालती मुंडा, तोइजम थोइबिसाना चानू, एस. रंजना चानू, एन. स्वीटी देवी, विकसित बारा, हेमाम शिल्की देवी. मध्यफळी-किरण पिसदा, एन.रत्नबाला देवी, मुस्कान सुब्बा, एल. बाबिना देवी, कार्तिका अंगमुथू, सिन्डी कॉलनी, संगीता बसफोर, प्रियदर्शिनी एस., बेबी सना, संतोष, अंजू तमंग. आघाडी फळी-मौसमी मुरमू, मालविका पी., संधिया रंगनाथन, सौम्या गुगुलोथ, सुलंजना राउल, लीन्डा कोम सेर्टो, रिम्पा हलदर, मनीषा नाईक, रेणू, करिश्मा पुरुषोत्तम शिरवईकर, सुमती कुमारी, मनीषा कल्याण, ग्रेस दांगमेई. प्रमुख प्रशिक्षक-क्रिस्पिन चेत्री, साहायक प्रशिक्षक-प्रिया पीव्ही, गोलरक्षक प्रशिक्षक-दीपांकर चौधरी.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article