For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला संघ मालिका आघाडीसाठी सज्ज

06:12 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला संघ मालिका आघाडीसाठी सज्ज
Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघामध्ये दुसरा वनडे सामना येथे बुधवारी खेळविला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारताने पहिला सामना जिंकून आघाडी घेतली असून आता मालिका विजयासाठी ते सज्ज झाले आहेत. या सामन्याला बुधवारी दुपारी दीड वाजता प्रारंभ होईल.

उभय संघातील या मालिकेत पहिला सामना एकतर्फी झाला. भारतीय महिला संघाने बलाढ्या दक्षिण आफ्रिकेचा 143 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली होती. भारतीय संघाच्या या विजयाचे श्रेय शतकवीर स्मृती मानधनाला द्यावे लागेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल. बुधवारच्या सामन्यात सलामीची फलंदाज शेफाली वर्मा फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. शेफाली वर्माने वनडे क्रिकेटमधील आपले यापूर्वीचे शेवटचे अर्धशतक लंकेविरुद्ध 2022 साली नोंदविले होते. त्यानंतर गेल्या 6 सामन्यात तिला दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. त्याचप्रमाणे कर्णधार हरमनप्रीत कौरलाही या सामन्यात फलंदाजीचा सूर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुखापतीतून बरी झालेली जेमिमा रॉड्रिग्ज पहिल्या सामन्यात प्रभावी कामगिरी करु शकलेली नाही. 2023 च्या क्रिकेट हंगामात ती चांगल्याच फॉर्ममध्ये होती. उपकर्णधार स्मृती मानधनाने वनडे क्रिकेटमधील आपले सहावे शतक झळकविले आहे. भारतीय संघातील फिरकी गोलंदाज आशा शोभनाने पहिल्या सामन्यात 21 धावांत 4 गडी बाद केले होते. पूजा वस्त्रकरच्या तंदुरूस्ती समस्येबाबत साशंकता निर्माण झाली आहे. वस्त्रकर बुधवारच्या सामन्यात खेळू शकली नाही तर अरुंधती रे•ाrला संधी मिळू शकते.

Advertisement

पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कामगिरी अत्यंत निराशजनक झाली. चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय फिरकी गोलंदाजांनी चांगलेच दमविले. बुधवारच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. मात्र या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारताचे पारडे निश्चितच जड राहिल.

Advertisement
Tags :

.