For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिलांचा जर्मनीकडून पराभव

06:00 AM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलांचा जर्मनीकडून पराभव
Advertisement

वृत्तसंस्था/सॅँटियागो

Advertisement

येथे सुरू असलेल्या एफआयएच ज्युनियर महिला विश्वचषक मोहीमेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाला जर्मनीकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला. जर्मनीकडून लीना फ्रेरिच (5), अन्निका शॉनहॉफ (52) आणि मार्टिन रीझेनेगर (59) यांनी गोल केले. दोन्ही संघ सुरूवातीलाच आपले वर्चस्व गाजवण्यास उत्सुक होते. जर्मानीने सुरूवातीच्या काही मिनिटांतच भारताला बॅकफूटवर ढकलले आणि पाचव्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक मिळवला. लीना फ्रेरिचने जागेवरुन कोणतीही चूक केली नाही आणि तिच्या संघाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. पिछाडीवर पडल्यानंतर भारत हळूहळू त्यांच्या लयीत स्थिरावला आणि स्वत:च्या संधी निर्माण करु लागला. तथापि, पहिल्या क्वार्टरमध्ये बरोबरी साधण्यासाठी आवश्यक असलेला अंतिम टच त्यांना मिळाला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये खेळाची तीव्रता कमी झाली नाही. कारण भारताने बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले.

भेदक प्रतिहल्ले करुन, त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. मनीषाने सर्वात उल्लेखनीय संधी निर्माण केली. एक शानदार धाव घेत आगेकूच करून एक विलक्षण संधी निर्माण केली जी व्यर्थ गेली. दुसऱ्या पेनल्टी स्ट्रोकवर जर्मनीला दुसऱ्या हाफच्या शेवटी आघाडी दुप्पट करण्याची संधी मिळाली होती. पण यावेळी लीना फ्रेरिच गोल करण्यात अपयशी ठरली. पहिला हाफ 1-0 असा संपला. भारताने दुसऱ्या हाफची सुरूवात जोरदार केली. त्यांच्या आक्रमणात गती आणली आणि जर्मनी पेनल्टी क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी पेनल्टी कॉर्नर मिळविला. त्यावर बरोबरी करण्याची संधी होती. परंतु त्यात त्यांना अपयश आले. तीन सत्रातील जोरदार खेळानंतर, खेळाचा वेग थोडा कमी झाला आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये जाताना भारत अजूनही फक्त एका गोलाने पिछाडीवर होता. भारताला बरोबरी साधण्याची घाई होती. दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवरुन ते गोल करण्याच्या जवळ आले. पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. मात्र जर्मनीने  अॅनिका शॉनहॉफ (52 मिनिट) गोल करुन आघाडी दुप्पट केली. भारताचा पुढील सामना 5 डिसेंबर रोजी आयर्लंडशी होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.