For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिलांचा विंडीजवर मालिकाविजय

10:16 AM Dec 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलांचा विंडीजवर मालिकाविजय
Advertisement

टी-20 मालिका : विंडीजवर 60 धावांनी मात, रिचा घोष सामनावीर, स्मृती मानधना मालिकावीर

Advertisement

वृत्तसंस्था/नवी मुंबई

रिचा घोषने वेगवान अर्धशतक नोंदवण्याच्या विक्रमाशी केलेली बरोबरी आणि कर्णधार स्मृती मानधनाने नोंदवलेले ग्रेसफुल अर्धशतक, राधा यादवने टिपलेले 4 बळी यांच्या आधारे भारतीय महिला संघाने विंडीज महिला संघावर 60 धावांनी मात करीत तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 21 चेंडूत 54 धावा फटकावणाऱ्या रिचा घोषला सामनावीर तर मालिकेत 191 धावा करणाऱ्या स्मृती मानधनाला मालिकावीराचा बहुमान मिळाला. ऑक्टोबर 2019 नंतर मायभूमीत जिंकलेली ही पहिली टी-20 मालिका आहे. रिचा घोषने 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण करीत विक्रमाशी बरोबरी केली तर स्मृतीने आक्रमक खेळ करीत 47 चेंडूत 77 धावा तडकावल्या. रिच्याच्या खेळीत  3 चौकार व पाच षटकारांचा समावेश होता तर स्मृतीने 13 चौकार, एक षटकार मारला.

Advertisement

याशिवाय राघवी बिस्तने 22 चेंडूत नाबाद 31 व जेमिमा रॉड्रिग्सने 28 चेंडूत 39 धावा झोडपल्या. भारताने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 217 धावा फटकावल्या. त्यानंतर राधा यादवच्या भेदक माऱ्यासमोर विंडीज महिलांना 20 षटकांत 9 बाद 157 धावांपर्यंतच मजल मारता आली. विंडीजच्या चिनेली हेन्रीने आक्रमक फटकेबाजी करीत केवळ 16 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह 43 धावा फटकावल्या. दियांद्रा डॉटिनने 17 चेंडूत 25, कर्णधार हेली मॅथ्यूजने 17 चेंडूत 22 व शेरमेन कॅम्पबेलने 11 चेंडूत 17 धावा काढल्या. भारताच्या राधा यादवने 29 धावांत 4 तर दीप्ती शर्मा, तितास साधू, सजीवन सजना, रेणुका सिंग यांनी एकेक बळी टिपले. आता या दोन संघांत 3 सामन्यांची वनडे मालिका होणार असून 22 डिसेंबरला पहिला सामना बडोद्यामध्ये होणार आहे.

संक्षिप्त धावफलक

  • भारत महिला संघ 20 षटकांत 4 बाद 217 : स्मृती मानधना 47 चेंडूत 77, जेमिमा  रॉड्रिग्स 28 चेंडूत 39, राघवी बिस्त 22 चेंडूत नाबाद 31, रिचा घोष 21 चेंडूत 3 चौकार, 5 षटकारांसह 54, सजना नाबाद 4, अवांतर 12, हेन्री 1-14, डॉटिन 1-54, आलिय अॅलीन 1-45, अॅफी फ्लेचर 1-24.
  • विंडीज महिला संघ 20 षटकांत 9 बाद 157 : मॅथ्यूज 17 चेंडूत 22, कियाना जोसेफ 11, डॉटिन 17 चेंडूत 25, कॅम्पबेल 11 चेंडूत 17, चिनेली हेन्री 16 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह 43, अवांतर 6, राधा यादव 4-29, तितास साधू 1-31, रेणुका सिंग 1-16, सजना 1-16, दीप्ती शर्मा 1-31.
Advertisement
Tags :

.