कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय महिलांची गाठ आज दक्षिण आफ्रिकेशी

06:36 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisement

आज बुधवारी येथे होणाऱ्या महिला तिरंगी मालिकेतील लढतीत दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना भारत पराभवातून सावरण्यास आणि अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यास उत्सुक असेल हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाची आठ सामन्यांची विजयी मालिका रविवारी यजमान श्रीलंकेविऊद्धच्या दुर्मिळ पराभवाने खंडित झाली.

Advertisement

सुऊवातीच्या दोन सामन्यांमधील प्रभावी कामगिराच्या आधारे 0.433 च्या उत्कृष्ट नेट रन रेटमुळे भारत अजूनही अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने चांगल्या स्थितीत असला, तरी संघ आज विजय मिळवून प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय महिला संघ तीन सामन्यांतून चार गुण मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेचेही चार गुण आहेत परंतु त्यांचा नेट रन रेट उणे 0.166 असा कमी आहे, तर अद्याप विजय मिळविता न आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. मात्र दक्षिण आफ्रिकी महिला एक सामना कमी खेळल्या आहेत.

या मालिकेत भारताची फलंदाजी ही एक मोठी सकारात्मक बाजू राहिली आहे. सलामीवीर प्रतीका रावलने दोन अर्धशतकांसह 163 धावा केल्या आहेत आणि सध्या धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ती अव्वल स्थानावर आहे. इतर फलंदाजांनीही यामध्ये योगदान दिले आहे. स्नेह राणा ही केवळ भारतीय संघातीलच नव्हे, तर संपूर्ण मालिकेचा विचार करता उत्कृष्ट गोलंदाज राहिली आहे. तिने तीन सामन्यांमध्ये 11 बळी घेतले आहेत आणि 4.25 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज नादिन डी क्लार्क (4.06 इकॉनॉमी रेट) हिच्यानंतरची ही दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी आहे.

दक्षिण आफ्रिकेविऊद्ध राणाने प्रथमच पाच बळी मिळविले होते आणि ही तिची प्रमुख कामगिरी आहे. तशी कामगिरी पुन्हा करण्याचा ती प्रयत्न करेल. पहिल्या दोन सामन्यांमध्ये गोलंदाजांनी भारताला विजय मिळवून दिला, परंतु श्रीलंकेविऊद्धच्या पराभवात त्यांची कामगिरी घसरली. रविवारी फक्त पाच षटके टाकल्यानंतर मध्यमगती गोलंदाजी करणारी अष्टपैलू खेळाडू काश्वी गौतम मैदानाबाहेर पडली. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. गोलंदाजीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, हे कर्णधार कौरने पराभवानंतर कबूल केले. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला फॉर्मसाठी संघर्ष करावा लागला आहे. त्यांनी गेल्या नऊ एकदिवसीय सामन्यांपैकी आठ सामने गमावले आहेत, ज्यामध्ये या मालिकेतील दोन्ही सामने समाविष्ट आहेत. त्यांनी पहिल्या सामन्यात भारताविऊद्ध जोरदार झुंज दिली, पण शेवटच्या षटकांमध्ये संघ कमी पडला. पुढच्या सामन्यात त्यांना यजमान श्रीलंकेने पुरते नमविले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article