कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत

06:05 AM Dec 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / मस्कत

Advertisement

येथे सुरू असलेल्या कनिष्ठ महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत विद्यमान विजेत्या भारताने थायलंडचा 9-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. या विजयामुळे भारतीय कनिष्ठ हॉकी महिला संघाने आगामी होणाऱ्या कनिष्ठांच्या विश्व चषक महिलांच्या हॉकी स्पर्धेसाठी आपले पात्रता सिद्ध केली आहे.

Advertisement

भारत आणि थायलंड यांच्यातील सामन्यात 17 व्या मिनिटाला भारताचे खाते राणा साक्षीने उघडले. त्यानंतर 23 व्या मिनिटाला सिवाच कनिकाने भारताचा दुसरा गोल केला. 25 व्या मिनिटाला सिवाचने पेनल्टी कॉर्नरवर भारताचा तिसरा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. 27 व्या मिनिटाला लालरीनपुई मैदानी गोल करत भारताची आघाडी 4-0 अशी वाढविली. 28 व्या मिनिटाला भारताचा पाचवा गोल दिपीकाने केला. मध्यंतरापर्यंत भारताने थायलंडवर 5 गोलांची आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तराधार्थ भारतातर्फे आणखी 4 गोल नोंदविले गेले. दिपीकाने 31 व्या मिनिटाला संघाचा सहावा आणि वैयक्तिक पहिला तसेच 35 व्या मिनिटाला संघाचा सातवा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. त्यानंतर 40 व्या मिनिटाला दिपीकाने संघाचा आठवा आणि वैयक्तिक तिसरा गोल करत हॅट्ट्रिक साधली. 55 व्या मिनिटाला दिपीकाने वैयक्तिक व चौथा आणि संघाचा नववा गोल करुन थायलंडेचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.

या स्पर्धेत भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखत वाटचाल केली आहे. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 13-1 अशा गोल फरकाने तर त्यानंतर मलेशियाचा दुसऱ्या सामन्यात 5-0 असा पराभव केला होता. या स्पर्धेत एकूण पाच संघांचा समावेश आहे. उपांत्य फेरीचे सामने शनिवारी तर रविवारी अंतिम सामना खेळविला जाईल. भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने जपानमध्ये गेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविताना दक्षिण कोरियाचा अंतिम सामन्यात पराभव केला होता.

 

 

त्रिशा-गायत्री यांचे आव्हान

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article