महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय महिला हॉकी संघ पराभूत

06:49 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या प्रो-लीग हॉकी स्पर्धेमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची पराभवाची मालिका कायम राहिली आहे. रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात यजमान ब्रिटनने भारताचा 3-2 असा पराभव केला. भारतीय महिला संघाचा हा आठवा पराभव आहे.

Advertisement

भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रो-लीग हंगामाचा शेवट रविवारच्या पराभवाने झाला. रविवारच्या सामन्यात 14 व्या मिनिटाला भारताचे खाते लालरेमसियामीने उघडले. तत्पूर्वी म्हणजे सामन्यातील 3 ऱ्या मिनिटाला वॅटसन चार्लोटीने ब्रिटनचे खाते उघडून भारतावर आघाडी मिळविली. 23 व्या मिनिटाला नवनीत कौरने मैदानी गोल नोंदवून ब्रिटनशी बरोबरी केली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. ग्रेस बॅलेडसनने 2 मिनिटांच्या कालावधीत 2 गोल नोंदवित भारताचे आव्हान 3-2 असे संपुष्टात आणले. भारतीय संघाची या स्पर्धेतील कामगिरी अत्यंत निराशजणक झाली आहे. भारतीय महिला संघाने सलग 8 सामने गमविले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media#sports
Next Article