For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वचषकासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर

06:56 AM Aug 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
विश्वचषकासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर
Advertisement

वेगवान गोलंदाज रेणुका ठाकुरचा समावेश, प्रतीका रावललाही पसंती, शफाली वर्माला डच्चू,

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

तंदुऊस्त झालेली वेगवान गोलंदाज रेणुका ठाकुर हिचा घरच्या मैदानावर होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या महिला विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच आघाडीची फलंदाज प्रतीका रावल हिला पसंती देताना फटकेबाज शफाली वर्माला वगळण्यात आले आहे. विश्वचषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका यासाठी निवडलेल्या दोन्ही संघांचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे.

Advertisement

आयसीसी स्पर्धेची सुऊवात 30 सप्टेंबर रोजी भारताच्या श्रीलंकेविऊद्धच्या सामन्याने होणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये अपवादात्मक कामगिरी केलेल्या रावलला सलामीवीर शफालीला डावलून पसंती देण्यात आली आहे. निवड समितीने विश्वचषकापूर्वी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठीचा संघही जाहीर केला आहे. ही मालिका 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

विश्वचषक संघ आणि ऑस्ट्रेलिया मालिकेसाठीचा संघ एकसारखाच दिसतो. अमनजोत कौरला सदर महास्पर्धेसाठी पूर्णपणे तंदुऊस्त होण्याच्या दृष्टीने अधिक वेळ देण्यात आला आहे आणि सायली सातघरेला विश्वचषकापूर्वीच्या एकदिवसीय सामन्यांसाठीच्या संघात तिची जागा मिळाली आहे. येथील बीसीसीआय मुख्यालयात संघ जाहीर केल्यानंतर हरमनप्रीत आणि निवड समिती प्रमुख नीतू डेव्हिड यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारतावर घरच्या मैदानावर जिंकण्याचे दडपण असेल, कारण यजमान संघाने कधीही विश्वविजेतेपद मिळविलेले नाही आणि 36 वर्षीय हरमनप्रीतची बहुदा ही तिच्या शेवटच्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याची खेप असेल.

भारताच्या माजी फिरकी गोलंदाज असलेल्या डेव्हिड म्हणाल्या की, ‘शफालीचा सलामीवीराच्या जागेसाठी विचार करण्यात आला होता, पण शेवटी रावलला पसंती देण्यात आली. ‘शफाली आमच्या रचनेत समाविष्ट आहे, आमचे तिच्यावर लक्ष आहे आणि ती जितकी जास्त खेळेल तितकी ती भविष्यात एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताची सेवा करू शकेल’, असे डेव्हिड म्हणाल्या. रेणुकाच्या दुखापतीतून पुनरागमनाबद्दल बोलताना डेव्हिड पुढे म्हणाल्या की, रेणुका ही नेहमीच एक मौल्यवान खेळाडू राहिली आहे. तिच्या काही समस्या होत्या, पण ती आता उपलब्ध आहे. या विश्वचषकासाठी ती आमची मुख्य खेळाडू आहे.

तसेच विश्वचषक संघात 22 वर्षीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडला स्थान मिळाले आहे. तिने अलीकडच्या इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यात सहा बळी घेतले होते. निवडलेल्या फिरकीपटूंमध्ये श्रीचरणी, स्नेह राणा, राधा यादव आणि अनुभवी दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंह ठाकूर, अऊंधती रे•ाr, रिचा घोष, क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्रीचरणी, यस्तिका भाटिया आणि स्नेह राणा.

ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंह ठाकूर, अऊंधती रे•ाr, रिचा घोष, क्रांती गौड, सायली सतघरे, राधा यादव, श्रीचरणी, यास्तिका भाटिया व स्नेह राणा.

Advertisement
Tags :

.