For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष्य उपांत्यफेरीवर

06:00 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष्य उपांत्यफेरीवर
Advertisement

वृत्तसंस्था /डंबुला (लंका)

Advertisement

येथे सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारत आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यात सामना होणार आहे. हरमनप्रित कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिला संघाने या स्पर्धेतील शुक्रवारच्या सलामीच्या सामन्यात पारंपरिक पाकिस्तानचा 7 गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली आहे. या विजयामुळे भारताला दोन गुण मिळाले असून आता भारतीय संघाचे लक्ष्य स्पर्धेच्या उपांत्यफेरीवर राहील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी समाधानकारक झाली असून त्यांनी या सामन्यात +2.29 अशी धाव सरासरी राखली आहे. आता रविवारच्या सामन्यात भारताने युएईवर विजय मिळविल्यास त्यांचे 4 गुण होतील आणि त्यांना या स्पर्धेची उपांत्यफेरी गाठणे सोपे जाईल. भारतीय संघ रविवारच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरात संघाला कमी लेखनाची चूक करणार नाही. भारतीय संघाच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने दीप्ती शर्मा, रेणुकासिंग ठाकुर आणि पूजा वस्त्रकर यांच्यावर राहील. श्रेयांका पाटील तसेच हेमलता उपयुक्त गोलंदाजी करू शकतील.

पाकबरोबरच्या शुक्रवारच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी अपेक्षेपेक्षा अधिक धावा दिल्या. मात्र दीप्ती शर्माची गोलंदाजी किफायतशीर ठरली. राधा यादव रविवारच्या सामन्यात खेळणार असल्याने भारताची गोलंदाजी अधिक भक्कम होण्यास मदत होतील. शेफाली वर्मा, उपकर्णधार मानधना यांना पहिल्याच सामन्यात फलंदाजीचा सूर मिळाल्याचे दिसून येते. या जोडीने पाकविरुद्ध 9.3 षटकात 85 धावांची भागिदारी केली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विद्यमान विजेता भारतीय महिला क्रिकेट संघ पुन्हा आपले वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करेल. चालू वर्षाच्या अखेरीस बांगलादेशमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेपूर्वी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा भारतीय संघाच्या दृष्टीने सरावाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे. या स्पर्धेतून भारतीय संघाला बऱ्यापैकी सराव करण्याची संधी मिळते. संयुक्त अरब अमिरात संघाचे नेतृत्त्व ईशा रोहित ओझाकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेतील शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात नेपाळने संयुक्त अरब अमिरातचा 6 गड्यांनी पराभव केला. रविवारी या स्पर्धेत पाकिस्तानचा दुसरा सामना नेपाळबरोबर होत आहे.

Advertisement

►भारत- हरमनप्रित कौर (कर्णधार), मानधना, शेफाली वर्मा, रॉड्रीग्ज, रिचा घोष, उमा छेत्री, पूजा वस्त्रकर, दीप्ती शर्मा, अरुंधती रे•ाr, रेणुकासिंग ठाकुर, डी. हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, सजना सजीवन.

►युएई - ईशा ओझा (कर्णधार), कविशा कुमारी, ऋतिका रजीत, समीरा डी. लावण्या केनी, इमेली थॉमस, हिना हरिष, मेहक ठाकुर, इंदुजा नंदकुमार, रिनीता आर. खुशी शर्मा, रशिता रजित, सुरक्षा कोटे, तिर्था सतीश आणि वैष्णवी महेश.

Advertisement
Tags :

.