भारतीय महिला ‘ए’ हॉकी संघ चीनचा दौरा करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत ए महिला हॉकीचा संघ चीनच्या दौऱ्यावर 13 ते 21 अॅक्टोबरमध्ये लियाओनिंग टीमच्या विरुद्ध पाच सामने खेळणार आहे. हे सामने दलियान येथील लियानओनिंग स्पोर्ट्स सेंटरमध्ये आयोजित केले आहेत. या दौऱ्यात भारतीय महिला हॉकी संघाला या सराव सामन्यात भारताला आंतरराष्ट्रीय अनुभव मिळणार आहे.
भारतीय सराव सामने 13, 15, 17, 19 आणि 21 ऑक्टोबर रोजी लियाओनिंग संघाबरोबर लढणार आहे. या मालिका भारतीय युवा खेळाडूना आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या लढतीतील त्यांचे कौशल्य आजमावून पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये अनुभवी डिफेंडर मनीषा चौहान भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे तर भारतीय महिला हॉकी संघाचे डेव स्मोलेनार्स मुख्य प्र्रशिक्षक राहणार आहेत.
भारतीय ए हॉकी संघ : गोलकीपर-बंसारी सोलंकी, माधुरी किंडो. डिफेंडर-मनीषा चौहान, अक्षता आबासो ढेकळे, ज्योती छात्री, महिमा चौधरी, अंजना डुंगडुंग. मिडफील्डर-सुजाता कुजूर, दीपिका सोरेंग, अजमीना कुजूर, पूजा यादव, बलजीत कौर, दीपी मोनिका टोप्पो. फॉरवर्ड- अलबेला राणी टोप्पो, रितीका सिंह, अन्नू, चंदना जगदीशा, काजल आटपाडकर, सेलेस्टिना होरो.