महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय महिला विजयी, पुरुष संघ पराभूत

06:34 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वर्ल्ड टेटे सांघिक चॅम्पियनशिप : अर्चना, दिया, मनिका यांचे विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ बुसान

Advertisement

येथे सुरू असलेल्या विश्व टेबल टेनिस सांघिक चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला टेबल टेनिस संघाने उझ्बेकिस्तानचा पराभव केला तर पुरुष संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

ऐहिका मुखर्जी व श्रीजा अकुला यांना या लढतीसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या जागी अर्चना कामत व दिया चितळे यांना संधी देण्यात आली होती. या दोघींनीही आपापले एकेरीचे सामने जिंकल्यानंतर मनिका बात्रानेही आपला सामना जिंकत 3-0 असा एकतर्फी विजय मिळविला. अर्चनाने रिमा गुफ्रानोव्हचा 11-7, 11-3, 11-6 असा पराभव केला तर मनिका बात्राने मरखाबो मॅग्डीएव्हावर 11-7, 11-4, 11-1 अशी सहज मात केली. दिया चितळेला मात्र विजयासाठी थोडा संघर्ष करावा लागला. तिने रोझालिना खादजिएव्हाचे आव्हान 11-6, 10-12, 11-4, 11-6 असे संपुष्टात आणले.

भारतीय महिलांनी या स्पर्धेची सुरुवात चीनविरुद्धच्या 2-3 अशा पराभवाने केली. पण त्यानंतर सलग दोन विजय मिळवित गट एकमध्ये दुसरे स्थान मिळविले आहे. गटातील शेवटच्या लढतीत त्यांची गाठ स्पेनशी पडणार आहे.

पुरुष विभागात अनुभवी शरथ कमल, विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन हरमीत देसाई व जी. साथीयान या तिघांनाही एकेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या मानांकित दक्षिण कोरियाकडून त्यांना एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला.  गटातील त्यांचा हा दुसरा पराभव आहे. हरमीतला जागतिक 14 व्या मानांकित जांग वूजिनकडून 4-11, 10-12, 8-11, साथियानला जागतिक सोळाव्या मानांकित लिम जाँगहूनकडून 5-11, 7-11, 7-11 तर शरथला ली सॅन सुकडून 9-11, 11-8, 6-11, 5-11 असा पराभव पत्करावा लागला. भारतीय पुरुष संघाने चिलीविरुद्धची पहिली लढत जिंकली होती, पण त्यानंतर पोलंडकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article