इंग्लंडविऊद्धची मालिका जिंकण्यास आज भारतीय महिला सज्ज
चौथी टी-20 लढत : भारताला हरमनप्रीत, शफाली यांच्याकडून अधिक योगदानाची अपेक्षा
वृत्तसंस्था / मँचेस्टर
भारतीय महिलांचा इंग्लंडविरुद्धचा चौथा टी-20 सामना आज बुधवारी होणार असून यावेळी मालिका जिंकण्याच्या दृष्टीने कर्णधार हरमनप्रीत कौर आणि आक्रमक सलामीवीर शफाली वर्मा यांच्याकडून फलंदाजीत चांगले योगदान मिळण्याची आशा संघ बाळगून असेल.
पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. परंतु गेल्या आठवड्यात ओव्हल येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने पाच धावांनी विजय मिळवला. त्यावेळी पाहुण्यांच्या कामगिरीत काही त्रुटी आढळल्या. शफालीने 25 चेंडूंत 47 धावा केल्या आणि हरमनप्रीतने 17 चेंडूंत 23 धावा केल्या, परंतु दोन्ही फलंदाजांना चांगल्या सुरुवातीनंतर डावाची उभारणी करता आली नाही. ज्यामुळे भारताला काही प्रमाणात वेग मंदावला. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि अमनजोत कौर यांनी आतापर्यंत भारताच्या फलंदाजीची धुरा सांभाळली आहे आणि त्यांना या दोन अनुभवी खेळाडूंकडून मजबूत पाठिंबा अपेक्षित असेल. वैयक्तिक पातळीवरही शफाली मोठी छाप सोडण्यास उत्सुक असेल. कारण या मालिकेसाठी आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर ती भारतीय संघात परतलेली आहे आणि अद्याप ती मोठी धावसंख्या उभारू शकलेली नाही.
पुनरागमन केल्यानंतर इतर दोन सामन्यांत तिचे योगदान 20 आणि 3 असे राहिले. एका सराव सामन्यात डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे पहिला सामना गमावलेल्या हरमनप्रीतने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी हरलीन देओलची जागा घेतली, परंतु तिला 1 आणि 23 इतक्याच धावा करता आल्या. पहिल्या सामन्यात देओलने नॉटिंगहॅम येथे 23 चेंडूंत 43 धावा केल्या होत्या, ज्यामुळे मानधनाला तिची लय कायम राखता आली होती. या मालिकेत संघाला फिरकीपटू एन. श्रीचरणी (8 बळी), दीप्ती शर्मा (6 बळी) आणि वेगवान गोलंदाज अऊंधती रे•ाr (4 बळी) यांनी चांगली साथ दिली असून त्यांनी नियमित यश मिळवले आहे.
परंतु त्यांना डावखुरी फिरकीपटू राधा यादव आणि वेगवान गोलंदाज अमनजोत यांच्याकडून थोडी अधिक साथ मिळण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांनी मागील तीन सामन्यांमध्ये प्रति षटक 8.5 आणि 9 धावा दिल्या आहेत. इंग्लंडच्या दृष्टिकोनातून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्यासाठी त्यांना अजूनही फलंदाजीत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मागील सामन्यात यजमान संघाने 9 बाद 171 अशी मजल सोफिया डंकले आणि डॅनी वायट-हॉज यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मारली. उर्वरित संघ 16 व्या षटकांतील 1 बाद 137 अशा भक्कम स्थितीतून गडगडला होता. अनुभवी भारतीय फलंदाजीला रोखण्याच्या दृष्टीने त्यांच्या गोलंदाजांनी वेगवान गोलंदाज लॉरेन बेलला अधिक चांगली साथ देण्याची आवश्यकता आहे.
सामन्याची वेळ : रात्री 11 वा.