भारतीय महिला आज ‘वनडे’ मालिका जिंकण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ लंडन
भारतीय महिलांची इंग्लंडविरुद्धची दुसरी एकदिवसीय लढत आज शनिवारी होणार असून हा सामना मालिकेचे भवितव्य ठरविण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अनेक सामने जिंकून देऊ शकणाऱ्या खेळाडूंनी भरलेला भारतीय संघ आगामी विश्वचषकासाठीची आपली उत्कृष्ट तयारी त्यातून कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
साउथहॅम्प्टन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने चार गड्यांनी विजय मिळवला आणि लॉर्ड्सवरील विजयामुळे पाहुण्या संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी मिळेल. यामुळे अलीकडच्या काळातील या प्रकारातील त्यांच्या विजयांची संख्या वाढेल. यात मे महिन्यात जिंकलेल्या श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेचाही समावेश होतो. इंग्लंडविऊद्धचे सामने या वर्षाच्या अखेरीस भारताकडून आयोजित केल्या जाणार असलेल्या आयसीसी महिला एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत.
अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने विश्वचषक संघात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा वाढत आहे, परंतु ही समस्या भारताचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यासाठी आनंददायी डोकेदुखी आहे. यामुळे व्यवस्थापनाकडे काही भूमिकांसाठी निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले असून संघाची खोली आणि राखीव ताकद कधीच इतकी चांगली नव्हती. दुखापतींमुळे खेळू न शकलेल्या वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर आणि पूजा वस्त्रकार यांच्या अनुपस्थितीत संघाने थोड्या जास्त अनुभवी अऊंधती रे•ाrपेक्षा क्रांती गौडला पसंती दिली. या 21 वर्षीय नवोदित खेळाडूने अमनजोत कौरसोबत नवीन चेंडू हाताळताना पहिल्या सामन्यात दोन मोठे बळी मिळविले.
वरच्या क्रमांकांवर स्मृती मानधनाची जोडीदार म्हणून प्रतीका रावलला पसंती मिळाली आहे, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामने, महिला प्रीमियर लीग आणि स्थानिक क्रिकेटमधील फॉर्ममुळे शफाली वर्माही शर्यतीत आहे. हरलीन देओल देखील चांगल्या स्थितीत आहे आणि जर शफालीने नजीकच्या भविष्यात संघात पुनरागमन केले, तर रावलला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले जाऊ शकते. तथापि, अशा परिस्थितीत हरमनप्रीत, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा आणि रिचा घोष यांचा समावेश असलेल्या लाइन-अपमध्ये देओलला सामावून घेणे कठीण होईल.
डावखुरी फिरकी गोलंदाज एन. श्रीचरणी हिच्यासोबत दीप्ती, स्नेहा राणा आणि राधा यादव यांचा समावेश असलेल्या फिरकी गोलंदाजीमध्ये भरपूर सखोलता आहे. यापूर्वीच्या टी-20 मालिकेत 10 फलंदाजांना बाद करून सर्वाधिक बळी मिळवल्याबद्दल श्रीचरणीला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले होते. पहिल्या एकदिवसीय सामन्यात सामना जिंकून देणाऱ्या अर्धशतकादरम्यान रिषभ पंतसारखा एका हाताने षटकार खेचलेली वरिष्ठ अष्टपैलू दीप्ती हिच्यावर आज शनिवारी सर्वांच्या नजरा राहतील.
भारतीय संघासाठी सर्व गोष्टी योग्यरीत्या घडत असून त्यांनी टी-20 मालिका जिंकण्यासह दौऱ्यात जवळजवळ सर्वच आव्हाने यशस्वीरीत्या पेलली आहेत. त्यात एकदिवसीय मालिका जिंकल्यास भर पडून 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेपूर्वी भारताची तयारी आणि मनोबल आणखी वाढेल. इंग्लंडचा विचार केला त्यांना स्वत:स सावरून सामने जिंकण्याची सुऊवात करावी लागेल. पहिल्या सामन्यातील निकाल हा इंग्लंडच्या भूमीवरील भारताचा सलग पाचवा एकदिवसीय विजय होता.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.