कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय महिला आज हाँगकाँगला नमविण्यास सज्ज

06:51 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अलान्या (तुर्की)

Advertisement

आपल्या पहिल्या सामन्यात एस्टोनियाला नमविताना निर्धारी फुटबॉल खेळलेल्या भारताच्या महिला संघाचा आज शनिवारी येथे तुर्की महिला चषक स्पर्धेत हाँगकाँगशी सामना होणार आहे. यावेळी आपल्या आणखी एका यशस्वी लढतीची नोंद करण्याच्या दृष्टीने संघ प्रयत्नरत राहील.

Advertisement

एस्टोनियाविऊद्ध 4-3 ने मिळवलेला विजय हा वरिष्ठ भारतीय महिला राष्ट्रीय संघाचा एखाद्या युरोपियन संघाविऊद्धचा पहिलाच विजय आहे आणि त्यामुळे चार संघांच्या या साखळी स्पर्धेत उतरलेल्या चाओबा देवी यांच्याकडून प्रशिक्षित संघाचे मनोबल उंचावले आहे. ‘फिफा’च्या क्रमवारीत 79 व्या क्रमांकावर असलेल्या हाँगकाँगविऊद्धचा भारताचा हा पाचवा सामना आहे आणि भारताने मागील चारही सामन्यांमध्ये विजय मिळविताना 11 गोल नोंदविलेले आहेत, तर हाँगकाँगला फक्त दोनच गोल करता आलेले आहेत.

भारत सध्या गुणतालिकेत तीन गुणांसह आणि ‘प्लस वन’ गोल फरकासह आघाडीवर आहे. हाँगकाँग कोसोवोकडून 0-1 ने पराभूत झालेला असल्याने त्यांचे खाते उघडलेले नाही आणि उणे 1 गोलफरकाने तो तळाशी आहे. प्रशिक्षक चाओबा देवी यांनी म्हटले आहे की, हाँगकाँग 2019 मध्ये शेवटचा आमच्याविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून त्यांनी लक्षणीय सुधारणा केली आहे आणि आपला संघ त्यांना कमी लेखणार नाही.

‘आम्ही आमच्या फिनिशिंगवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, कारण आमचे फिनिशिंग चांगले असते, तर एस्टोनियाविऊद्धच्या आमच्या पहिल्या सामन्यात आम्ही आणखी गोल करू शकलो असतो. हाँगकाँगविरुद्ध चांगल्या कामगिरीसाठी आम्ही आमच्या सरावात फिनिशिंगसंबंधीच्या काही बाबी वापरू. ही आमची स्पर्धा जिंकण्याची वेळ आहे, असे चाओबा देवी पुढे म्हणाल्या. मिडफिल्डर अंजू तमांगने सांगितले की, एस्टोनियाविऊद्धचा विजय हा संघातील एकसंधतेचा परिणाम आहे.

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media#sports#tarun bharat
Next Article