महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला 219 धावांवर गुंडाळले

06:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारत वि ऑस्ट्रेलिया महिला कसोटी, पहिला दिवस : टीम इंडियाची आश्वासक सुरुवात, दिवसअखेरीस 1 बाद 98

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई
Advertisement

मागील आठवड्यात इंग्लिश महिला संघाला नमवल्यानंतर भारतीय महिलांचा एकमेव कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. पहिल्याच दिवशी भारतीय महिलांनी वर्चस्व गाजवताना ऑस्ट्रेलियाला 219 धावांवर गुंडाळले. यानंतर पहिल्या दिवसअखेरीस दमदार सुरुवात करताना 19 षटकांत 1 बाद 98 धावा जमवल्या होत्या. भारतीय संघ अद्याप 121 धावांनी पिछाडीवर असून दिवसअखेरीस स्मृती मानधना 43 तर स्नेह राणा 4 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन महिला फलंदाज जास्त वेळ तग धरू शकल्या नाहीत. 77.4 षटकांचा खेळ झाल्यानंतर त्यांनी 219 धावांवर आपल्या सर्व विकेट्स गमावल्या. पहिल्या डावात सलामीवीर बेथ मुनी (40), ताहलिया मॅकग्राथ (50) आणि कर्णधार एलिसा हिली (38) यांनी महत्वपूर्ण धावांचे योगदान दिले. सलामीवीर फिबी लिचफिल्ड गोल्डन डकवर बाद झाली, तर तिसऱ्या क्रमांकावर खेळणारी एलिस पेरी 2 चेंडूत 4 धावा करून बाद झाली. तळातील फलंदाजांपैकी किम गर्थने नाबाद 28 धावांची खेळी केली. पण त्याव्यतिरिक्त एकही खेळाडू 20 धावांपेक्षा मोठे योगदान देऊ शकली नाही. तळाच्या इतर फलंदाजांनी निराशा केल्याने ऑस्ट्रेलियन संघाचा डाव 219 धावांवर आटोपला. भारताकडून बलाढ्या पूजा वस्त्राकर आणि स्नेह राणा यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. पूजाने 53 धावांत4 विकेट्स घेतल्या. स्नेह राणाने 56 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय, दीप्ती शर्मानेही दोन विकेट घेत मोलाचे योगदान दिले.

टीम इंडियाची आश्वासक सुरुवात

भारताच्या डावाची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर शेफाली वर्मा व स्मृती मानधना यांनी 90 धावांची सलामी दिली. ही जोडी जमलेली असतानाच शेफाली वर्मा 40 धावा करून जेस जोनासेन हिच्या चेंडूवर पायचीत झाली. यानंतर स्मृती व स्नेह राणा यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. भारतीय संघाने दिवसाच्या खेळ संपेपर्यंत 19 षटकांमध्ये एका विकेटच्या नुकसानावर 98 धावांपर्यंत मजल मारली. स्मृती मंधाना 49 चेंडूत 8 चौकारासह 43 धावा करून खेळपट्टीवर कायम आहे. स्नेह राणा 4 धावावर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलियन महिला संघ 77.4 षटकांत सर्वबाद 219 (बेथ मुनी 40, तहलिया मॅकग्रा 50, एलिसा हिली 38, किम गर्थ नाबाद 28, पूजा वस्त्रकार 4 तर स्नेह राणा 3 बळी, दीप्ती शर्मा 2 बळी). भारतीय महिला संघ 19 षटकांत 1 बाद 98 (शेफाली वर्मा 40, स्मृती मानधना खेळत आहे 43, स्नेह राणा खेळत आहे 4, जोनासेन 1 बळी).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article