भारतीय महिला कॅलिफोर्नियात बनली न्यायाधीश
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या लोकसंख्येपैकी फक्त एक टक्का लोक भारतीय वंशाचे आहेत. परंतु राजकारणापासून अर्थव्यवस्थेपर्यंत आणि न्यायव्यवस्थेपर्यंत सर्वच क्षेत्रांत केवळ या एक टक्के भारतवंशीय नागरिकांचा लक्षणीय प्रभाव दिसून येत आहे. आता भारतीय वंशाच्या जया बडिगा यांची पॅलिफोर्नियामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जया बडिगा या भारतातील तेलगूभाषिक आंध्रप्रदेश राज्यातून पॅलिफोर्नियामध्ये न्यायाधीश झालेल्या पहिल्या व्यक्ती आहेत. त्यांची सॅक्रामेंटो काउंटी सुपीरियर न्यायालयात नुकतीच न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी सॅक्रामेंटो काउंटी सुपीरियर न्यायालयासाठी आयुक्त म्हणून काम केले होते.
जया बडिगा यांचा जन्म आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे झाला. त्या उद्योगपती आणि माजी खासदार बडिगा रामकृष्ण आणि प्रेमलता यांच्या कन्या आहेत. जया यांचे वडील रामकृष्ण 2004 ते 2009 या काळात मछलीपट्टणमचे खासदार होते. रामकृष्ण दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. जया यांनी सुऊवातीचे शिक्षण हैदराबादमध्येच पूर्ण केले. हैदराबादस्थित उस्मानिया येथून त्यांनी मानसशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात बी.ए.ची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर पुढील शिक्षण अमेरिकेत केले. अमेरिकेतील सेंट क्लारा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून ज्युरीस डॉक्टरची पदवी प्राप्त केली. यासोबतच त्यांनी बोस्टन विद्यापीठातून इंटरनॅशनल रिलेशन आणि इंटरनॅशनल कम्युनिकेशनमध्ये एमए केले. 2009 मध्ये त्या पॅलिफोर्निया स्टेट बारची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या.