न्यूयॉर्कमध्ये भारतीय तंत्रज्ञाचा होरपळून मृत्यू
घरात झोपलेली असताना लागली आग
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये एका घरात आग लागल्यावर गंभीर होरपळलेल्या 24 वर्षीय भारतीय सायबर सुरक्षा प्रोफेशनलचा मृत्यू झाला आहे. सहजा रे•ाr उदुमाला हिने न्यूयॉर्कच्या अल्बानीमध्ये मास्टर डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि काही महिन्यांपूर्वीच तेथे तिने काम करण्यास सुरुवात केल होती.
न्यूयॉर्कच्या अल्बानी येथील स्वत:च्या घरात झोपलेली असताना अचानक आग लागली होती. या घटनेत ती गंभीर होरपळली होती, तर इमारतीत राहणारे दोन अन्य जण किरकोळ जखमी झाले होते. सहजा हिला न्यूयॉर्कच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जेथे सुमारे 15 तासांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला.
सहजा रे•ाr ही तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत गेली होती. तिचा परिवार तेलंगणाच्या जनगाव जिल्ह्यात राहतो. सहजाच्या मृत्यूप्रकरणी न्यूयॉर्कमधील भारतीय महावाणिज् दूतावासाने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. उदुमालाच्या परिवाराच्या संपर्कात असून शक्य ते सर्व सहाय्य प्रदान करत आहोत असे दूतावासाने सांगितले आहे.