महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय संघाची विजयी सलामी

06:28 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ चेंगशा (चीन)

Advertisement

मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या बिली जीन किंग चषक मिश्र सांघिक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सलामी देताना पॅसिफीक ओसेनियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. भारताच्या ऋतुजा भोसले आणि अंकिता रैना यांनी शानदार कामगिरी करत आपले एकेरीचे सामने जिंकले.

Advertisement

या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात ऋतुजा भोसलेने तेरानी केमोईचा पराभव करत भारताला आघाडीवर नेले. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात अंकिता रैनाने सेरोसी ब्रिनचा 6-1, 6-3 असा पराभव केला. हे दोन एकेरी सामने झाल्यानंतर भारताच्या श्रीवल्ली रश्मीका आणि प्रार्थना ठोंबरे यांनी दुहेरीच्या सामन्यात बुसी आणि कॉफीन यांचे आव्हान 6-1, 6-1 असे संपुष्टात आणल्याने भारताने ही लढत 3-0 अशी जिंकली. आता या स्पर्धेत भारताच्या पुढील फेरीत यजमान चीन, कोरिया, चीन तैपेयी व न्यूझीलंड यांच्याबरोबर लढती होणार आहेत. चीनमधील या स्पर्धेत आशिया ओसेनिया गट एक मधील 6 संघांचा समावेश असून, आघाडीचे पहिले दोन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article