भारतीय संघाच्या सरावाला प्रारंभ
वृत्तसंस्था/ लंडन
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्धच्या आगामी 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी लॉर्ड्स मैदानावर आपल्या सरावाला प्रारंभ केला.
लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघातील वेगवान गोलंदाज बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहमद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी बराच वेळ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. सराव सत्रामध्ये कर्णधार गिल, उपकर्णधार ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, तसेच प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा समावेश होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडच्या दौऱ्यासाठी भारतीय निवड समितीने गिलकडे कर्णधारपद सोपविण्याचा निर्णय घेतला. भारतीय कसोटी संघाचा गिल हा 37 वा कर्णधार आहे. 2007 पासून भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. या आगामी मालिकेतील पहिली कसोटी लिड्स मैदानावर 20 जूनपासून सुरु होणार आहे.