इराण विरुद्ध भारताची आज सत्वपरीक्षा
व्हिनटेनी(लावोस) : 2025 साली होणाऱ्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी येथे शुक्रवारी इराण विरुद्ध होणाऱ्या क गटातील सामन्यात भारतीय युवा फुटबॉल संघाची सत्वपरीक्षा ठरणार आहे. या स्पर्धेसाठी आयोजिलेल्या पात्र फेरीतील यापूर्वी झालेल्या ग गटातील पहिल्या सामन्यात भारतीय युवा संघाने मंगोलियाचा 4-1 अशा गोल फरकाने पराभव केला होता. मंगोलियान संघ निश्चितच दर्जेदार होता. पण भारतीय युवा फुटबॉल संघाने या स्पर्धेसाठी खास सराव केल्याने त्यांना विजय मिळविता आला. या विजयामुळे भारतीय युवा फुटबॉल संघाचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे. शुक्रवारी होणाऱ्या इराण विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची सत्वपरीक्षाच ठरणार आहे. दरम्यान या स्पर्धेत यापूर्वी झालेल्या पात्र फेरीच्या अन्य एका सामन्यात इराणने यजमान लाओसचा 8-0 असा दणदणीत पराभव केला होता.