ब्रिटनच्या लेस्टरशायरमध्ये दुर्घटना, भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
07:00 AM Dec 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
लंडन : ब्रिटनच्या लेस्टरशायर शहरात झालेल्या रस्ते दुर्घटनेत 32 वर्षीय भारतीय विद्यार्थी चिरंजीवी पंगुलुरीचा मृत्यू झाला आहे. चिरंजीवी ज्या कारमधून प्रवास करत होता ती दरीत कोसळली होती. या दुर्घटनेत अन्य तीन प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाला आहे. दुर्घटनेमागील कारणाचा शोध घेतला जात असल्याचे सांगत पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींना माहिती पुरविण्याचे आवाहन केले आहे. कारमधून प्रवास करत असलेल्या चिरंजीवी पंगुलुरीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चिंरजीवी हा आंध्रप्रदेशचा रहिवासी होता आणि तो लिसेस्टर येथे राहून शिक्षण घेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले अन्य प्रवासी हे देखील मूळचे आंध्रप्रदेशचे असल्याचे समजते. या दुर्घटनेनंतर ब्रिटनमधील भारतीय समुदायाने प्रभावित परिवारांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Advertisement
Advertisement