For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय शेअर बाजार घसरणीसोबत बंद

06:32 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय शेअर बाजार घसरणीसोबत बंद
Advertisement

सेन्सेक्स 210 अंकांनी घसरणीत, चार दिवसांच्या तेजीला विराम

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

सलग चार दिवस तेजी राखलेला भारतीय शेअर बाजार शुक्रवारी सरतेशेवटी घसरणीसोबत बंद झाला. बाजारामध्ये अखेरच्याक्षणी घसरण अनुभवायला मिळाली. गेले काही दिवस शेअर बाजार नव्या विक्रमांवर कार्यरत राहिला होता.

Advertisement

शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 210 अंकांनी घसरुन 79032 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 33 अंकांनी घसरुन 24010 अंकांवर बंद झाला. शुक्रवारी शेअर बाजारामध्ये नफावसुली पाहायला मिळाली. बाजारात सिडीएसएल कंपनीचे समभाग सर्वाधिक 19 टक्के इतके वाढले होते. यासोबत चोला फायनान्शीयल होल्डिंग्ज यांचे समभागसुद्धा 13 टक्क्यांच्या दमदार तेजीसमवेत बंद झाले होते.

शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांकाने 79546 ची विक्रमी पातळी गाठली होती. याला सोबत करताना निफ्टी निर्देशांकसुद्धा 24159 अंकांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. डॉक्टर रे•ाrज लॅब, ओएनजीसी, एनटीपीसी आणि टाटा मोटर्स यांचे समभाग सर्वाधिक तेजीसमवेत कार्यरत होते. डीव्हीज लॅब्ज, हिंडाल्को, कोल इंडिया यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. तर अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम, महिंद्रा आणि महिंद्रा, अदानी पोर्टस आणि मारुती सुझुकी यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे कामकाज शुक्रवारी मिळतेजुळते पहायला मिळाले. सुरुवातीला या कंपन्यांच्या समभागांनी तेजी राखली होती आणि अखेरच्या क्षणी मात्र बाजार बंद होताना घसरणीसोबत बंद झाले. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, इरकॉन इंटरनॅशनल, एचपीसीएल, आयआरसीटीसी, पॉवरग्रीड कॉर्प, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमीटेड, भारत डायनामिक लिमीटेड, कोचिन शिपयार्ड, इरेडा, बीईएमएल, माजगाव डॉक या कंपन्यांचे समभाग नुकसानीसह कार्यरत होते. टीटा गड रेल, एनएचपीसी लिमीटेड, गेल इंडिया, रेलटेल कॉर्पोरेशन, एनएमडीसी लिमीटेड यांचे समभाग मात्र तेजीसोबत व्यवहार करत होते. अंबुजा सिमेंट, अदानी पॉवर आणि अदानी एंटरप्रायझेस हे अदानी समुहातील तीन कंपन्यांचे समभाग हलक्या तेजीसोबत बंद झाले.

Advertisement
Tags :

.