For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

18 वर्षांनंतर भारतीय रिकर्व्ह संघाला आशियाई सुवर्ण

06:10 AM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
18 वर्षांनंतर भारतीय रिकर्व्ह संघाला आशियाई सुवर्ण
Advertisement

आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप : कोरियावर मात, अंकिता, धीरज यांनाही सुवर्णपदके

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका, बांगलादेश

अंकिता भगतने सनसनाटी विजय मिळवित पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकलेल्या दक्षिण कोरियाच्या नाम सुह्योऑनला 7-3 असा पराभवाचा धक्का देत सुवर्ण मिळविले तर धीरज बोम्मदेवरानेही आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्ण मिळवून दिले. याशिवाया भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाने 18 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणताना बलाढ्या दक्षिण कोरियाला चकित करून सुवर्णपदक पटकावले.

Advertisement

यशदीप भोगे, अतानू दास, राहुल या रिकर्व्ह पुरुष संघाने 2-4 अशी पिछाडी भरून काढत कोरियाच्या सेओ मिंगी, किम येचान, जँग जिहो या दुय्यम संघाचा 5-4 असा पराभव केला आणि 2009 पासूनची कोरियाची मक्तेदारी संपुष्टात आणत सुवर्ण मिळविले. शूटऑफपर्यंत लांबलेल्या या लढतीत शूटऑफमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 29 गुण मिळविले होते. पण अतानू दासने शेवटचा बाण बरोबर मध्याच्या जवळ मारल्याने भारताला विजयी घोषित करण्यात आले. 2007 नंतर या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला प्रथमच सुवर्णपदक मिळविता आले. या यशानंतर भारताची पदकसंख्या 4 सुवर्ण, 2 रौप्य इतकी झाली आहे. त्याआधी गुरुवारी कंपाऊंड संघानेही 3 सुवर्ण, 2 रौप्यपदके मिळविली आहे.

अंकिता, धीरजचेही सुवर्णयश

धीरजने वैयक्तिक रिकर्व्हच्या अंतिम फेरीत आपल्याच देशाच्या राहुलचा 6-2 असा पराभव केल्याने भारताला सुवर्ण व रौप्य पदके मिळाली. अंकिताने उपांत्य फेरीत तिची वरिष्ठ सहकारी दीपिका कुमारीला हरवून अंतिम फेरी गाठली होती. दोघींनी शूटऑफमध्ये प्रत्येकी 5 गुण मिळविले होते. पण अंकिताचा फटका सेंटरच्या अगदी जवळ असल्याने तिला अंतिम फेरीत स्थान मिळाले. अंतिम फेरीत अंकिताने सुह्योऑनवर पहिल्या सेटमध्ये 29-27 अशी बाजी मारल्यानंतर दुसऱ्या  सेटमध्ये दोघींच्याकडून चुका झाल्याने 27-27 अशी बरोबरी झाली. तिसरा सेट नामने 28-26 असा जिंकून अंकिताशी बरोबरी साधली. चौथ्या सेटमध्ये मात्र अंकिताने शानदार प्रदर्शन करीत दोनदा 10 गुण मिळवित 5-3 अशी आघाडी घेतली. निर्णायक सेटमध्ये अंकिताने पुन्हा एकदा दोनवेळा 10 गुण घेत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केला.

भारताने महिलांच्या रिकर्व्हमध्येही कांस्यपदक मिळविले. या पदकासाठी झालेल्या लढतीत संगीताअने अनुभवी दीपिका कुमारीचा 6-5 असा पराभव केला. भारताची एकूण पदकसंख्या 10 झाली असून त्यात 6 सुवर्ण, 3 रौप्य व 1 कांस्यपदकाचा समावेश आहे. पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्हमध्ये धीरजने अनुभवी जँग चाएहवानचा अंतिम फेरीत 6-2 असा पराभव करून जेतेपद पटकावले.

Advertisement
Tags :

.