For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय रेल्वे ‘रुळावर’

06:27 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय रेल्वे ‘रुळावर’
Advertisement

भारतीय रेल्वेतून दररोज कोट्यावधी लोक प्रवास करतात. मुंबईकरांसाठी तर रेल्वे म्हणजे ‘लाईफ लाईन’च आहे. देशात रेल्वेमार्गाचे एक प्रचंड मोठे जाळे विणले गेले आहे. या मार्गावरून रोज हजारो रेल्वेगाड्या धावतात. एखादा अपघात झाला की रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता मोठ्या रेल्वे अपघातांची संख्या घटल्याचे समोर आले आहे. 2000-01 या वर्षात 473 रेल्वे अपघात घडले. तर 2022-23 मध्ये हीच संख्या 48 वर होती.

Advertisement

ओडिसातील बालासोर येथे 2 जून 2023 रोजी झालेल्या रेल्वे अपघातात जवळपास 294 प्रवाशांना प्राण गमवावे लागले. तर सुमारे एक हजार प्रवासी जखमी झाले. या अपघाताची चौकशी होऊन रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई झाली. तरीदेखील या अपघाताने रेल्वे प्रवासांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला. भारतात रेल्वेचे सर्वात मोठे जाळे आहे. आता तर मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन चालविण्याचे सरकारचे स्वप्न आहे. अशावेळी मोठे रेल्वे अपघात या मार्गात अडथळे ठरू शकतात.

रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये ट्रॅक, पूल, ओव्हरहेड वायर्स, रोलिंग स्टॉक यांचा समावेश असून देखभालीचा अभाव, कालबाह्याता, मोडतोड किंवा नैसर्गिक आपत्ती यामुळे त्यात दोष उद्भवतो. बहुतेक पायाभूत सुविधा या 19 आणि 20 व्या शतकातील आहेत. आणि काळानुरुप त्यात बदल किंवा आधुनिक दर्जानुसार त्यात बदल केला गेलेला नाही. सिग्नल यंत्रणेतील सुधारणा आणि आणखी चांगल्या तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक तज्ञांना अपेक्षित आहे.

Advertisement

रेल्वे अपघातांची संख्या 2000-01 मध्ये प्रतिवर्ष 473 एवढी होती. ती 2022-23 मध्ये 48 वर आली. 2004 ते 2014 या कालावधीत मोठ्या रेल्वे अपघातांची सरासरी संख्या प्रतिवर्ष 171 इतकी होती. तर 2014 ते 2023 या कालावधीत रेल्वे अपघातांची सरासरी संख्या प्रतिवर्ष 70 एवढी होती. ट्रेन ऊळावरून घसरण्याची संख्या 2000-01 मध्ये 350 होती. ती 2022-23 मध्ये 36 पर्यंत खाली आली आहे. 2004 ते 2014 या कालावधीत ट्रेन ऊळावरून घसरण्याची सरासरी संख्या प्रतिवर्ष 86.7 होती. तर 2014 ते 2023 या कालावधीत ट्रेन ऊळावरून घसरण्याची सरासरी संख्या प्रतिवर्ष 47.3 इतकी असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.

  राष्ट्रीय रेल संरक्षण कोष

2017-18 मध्ये राष्ट्रीय रेल संरक्षण कोष गंभीर सुरक्षा मालमत्तेच्या बदली, नूतनीकरण आणि दर्जा सुधारण्यासाठी सुरू करण्यात आला. त्यात पाच वर्षांसाठी एक लाख कोटीचा समावेश होता. 2017-18 पासून 2021-22 पर्यंत एकूण 1.08 लाख कोटी ऊपये खर्च करण्यात आले.

इंटरलॉकिंग सिस्टिम

मानवी अपयशामुळे होणारे अपघात दूर करण्यासाठी 31 मे 2023 पर्यंत 6,427 स्थानकांवर पॉईंट्स आणि सिग्नल्सच्या केंद्रीकृत ऑपरेशनसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम बसविण्यात आली आहे. सुरक्षा वाढविण्यासाठी 11 हजार 93 लेव्हल क्रॉसिंग गेट्सवर इंटरलॉकिंग सुविधा देण्यात आली. 6,377 स्थानकांवर इलेक्ट्रिकल मार्गाने ट्रॅक ऑक्युपन्सीची पडताळणी करण्यासाठी स्टेशनचे संपूर्ण ट्रॅक सर्किटिंग करण्यात आले.

  रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह सिग्मा बोर्ड

सिग्नलिंगच्या सुरक्षिततेशी संबंधित समस्या लक्षात घेता प्रोटोकॉलनुसार S&T उपकरणांसाठी डिस्कनेक्शन आणि रिकनेक्शनच्या प्रणालीवर जोर देण्यात आला आहे. लोको पायलट्सची सतर्कता सुनिश्चित करण्यासाठी लोकोमोटिव्ह दक्षता नियंत्रण उपकरणे सुसज्ज करण्यात आली आहेत. रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह सिग्मा बोर्डमुळे धुक्याच्या हवामानामुळे दृश्यमानता कमी असेल तेव्हा क्रूला सिग्नल मिळतो. धुके प्रभावित भागात लोको पायलटना जीपीएस आधारित फॉग सेफ्टी डिव्हाईस (एफएसडी) दिले जातात. लोको पायलटना सिग्नल, लेव्हल क्रॉसिंग गेट्स इत्यादी जवळ येत असलेल्या खुणांचे अंतर जाणून घेता येते.

     लांब रेल्वे पॅनेलचा वापर

रेल्वेच्या नूतनीकरणाची प्रगती वाढविण्यासाठी आणि सांध्यांचे वेल्डिंग टाळण्यासाठी 130m/260m लांबीच्या रेल्वे पॅनेलचा जास्तीत जास्त पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. अॅल्युमिनो थर्मिक वेल्डिंगचा वापर कमी करणे आणि उत्तम वेल्डिंग तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. ओएमएस (ऑसिलेशन मॉनिटरिंग सिस्टम) आणि टीआरसी (ट्रॅक रेकॉर्डिंग कार) द्वारे ट्रॅकचे निरीक्षण केले जाते. नूतनीकरणाच्या कामांमध्ये जाड वेब स्विचेस आणि वेल्डेबल CMS क्रॉसिंगचा वापर केला जात आहे. ट्रॅक मालमत्तेची वेब आधारित ऑनलाईन देखरेख प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

  सुरक्षित कोच

पारंपरिक ICF efडझाईन कोच बदलून LHB डिझाईन कोच लावण्यात येत आहेत. मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी हलके आणि सुरक्षित डबे हे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. पारंपरिक डब्यांपेक्षा ते अधिक टिकावू आणि अग्निरोधक आहेत. ब्रॉडगेज मार्गावरील सर्व मानवरहित लेव्हल क्रॉसिंग जानेवारी 2019 पर्यंत काढून टाकण्यात आले आहेत. पुलांची नियमित तपासणी केली जात आहे. रेल्वेने सर्व डब्यांमध्ये प्रवाशांच्या माहितीसाठी ‘फायर नोटीस’ लावल्या आहेत. नवीन उत्पादित डब्यांमध्ये आग आणि धूर शोधण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सध्याच्या डब्यांमध्ये त्याचे प्रोग्रेसिव्ह फिटमेंटदेखील टप्प्याटप्प्याने विभागीय रेल्वेकडून सुरू आहे.

ट्रेन ऑपरेशन्समध्ये सुरक्षितता सुधारण्यासाठी, रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे सतत सिग्नलिंग सिस्टिम अपग्रेड करत आहे. जुन्या यांत्रिक सिग्नलिंगच्या जागी पॉईंट्स आणि सिग्नल्सच्या केंद्रीकृत ऑपरेशनसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिमची तरतूद करण्यात आली आहे. 11 हजार 93 लेव्हल क्रॉसिंग गेट्सवर इंटरलॉकिंग ऑफ लेव्हल क्रॉसिंग गेट्स (एलसी) प्रदान करण्यात आले आहेत. स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग 31 मे 2023 पर्यंत 3940 किलोमीटर मार्गावर करण्यात आले.

  कवच प्रणाली

स्वदेशी विकसित स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली ‘कवच’ ही विशिष्ट वेग मर्यादेत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये चालकांना मदत करण्यासाठी आणि खराब हवामानात गाड्या चालविण्यास मदत म्हणून स्वीकारण्यात आली आहे.

 चलती ट्रेन, घटते अपघात

2000-2001 ते 2022-23 या वर्षातील आकडेवारी पाहता मोठ्या आणि परिणामकारक रेल्वे अपघातांमध्ये मोठी घट झाली आहे. 2000-01 मध्ये अपघताची संख्या 473 एवढी होती. त्यानंतरच्या वर्षात ती घटत गेल्याचे दिसत आहे. 2001-02 मध्ये 415, 2002-03 मध्ये 351, 2003-04 मध्ये 325, 2004-05 मध्ये 234, 2005-06 मध्ये 234, 2006-07 मध्ये 195, 2007-08 मध्ये 194, 2008-09 मध्ये 177, 2009-10 मध्ये 165, 2010-11 मध्ये 141, 2012-13 मध्ये 122, 2013-14 मध्ये 118, 2014-15 मध्ये 135, 2015-16 मध्ये 107, 2016-17 मध्ये 104, 2017-18 मध्ये 73, 2018-19 मध्ये 59, 2019-20 मध्ये 55, कोविड काळात 2020-21 मध्ये 22 तर 2021-22 मध्ये 35 आणि 2022-23 मध्ये 48 अपघातांची नोंद आहे.

रेल्वे घसरण्याच्या प्रमाणातही घट

रेल्वे रुळावरून घसरण्याच्या घटनांतही गेल्या 23 वर्षात मोठी घट झाली आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 2000-01 या वर्षात रेल्वे रुळावरून घसरण्याच्या 350 घटनांची नोंद होती ती 2022-23 या वर्षात 36 वर आली आहे.

  मानवी चुकांमुळे अपघात

ट्रेन आणि ट्रॅकचे संचालन, देखरेख आणि व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार कर्मचाऱ्यांच्या चुकाही अपघातांना कारणीभूत ठरतात. थकवा, निष्काळजीपणा, भ्रष्टाचार किंवा सुरक्षा नियमांचे उल्लंघन यामुळे मानवी चुका होत असल्याचे दिसून येते. मानवी चुकांमुळे चुकीचे सिग्नलिंग, चुकीचा संवाद, अतिवेग अथवा धोक्यांकडे दुर्लक्ष होऊ शकते. ट्रॅकवरील गाड्यांची हालचाल आणि दिशा नियंत्रित करणाऱ्या सिग्नलिंग यंत्रणेतील तांत्रिक बिघाड अपघातांना कारणीभूत ठरतात. सिग्नलिंग बिघाडामुळे ट्रेन चुकीच्या ट्रॅकवर धावू शकतात आणि अन्य ट्रेन किंवा थांबलेल्या वस्तूंवर आदळू शकतात. ओडिशात झालेला रेल्वे अपघात हा इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलामुळे झाला होता, ज्याचा चालकांना योग्यप्रकारे संदेश दिला गेला नाही.

मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर अपघातांचा धोका

मानवरहित लेव्हल क्रॉसिंग अपघातस्थळे बनली आहेत. त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक क्रॉस केला जातो. तेथे अपघाताचा धोका अधिक असतो. कारण वाहने किंवा पादचाऱ्यांना जवळ येणारी ट्रेन लक्षात येत नाही किंवा ट्रेन जवळ असताना ते ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करतात. 2018-19 मध्ये भारतातील सर्व रेल्वे अपघातांपैकी 16 टक्के अपघात मानवरहित रेल्वे क्रॉसिंग स्थळावरील होते. रेल्वेने ब्रॉडगेज मार्गावरील सर्व मानवरहित लेव्हल क्रॉसिंग काढून टाकले आहेत. परंतु अजूनही अनेक मानवरहित लेव्हल क्रॉसिंग आहेत.

प्रचंड कंपनसंख्या असलेल्या ध्वनिलहरी यंत्रणेमुळे (ळएइअ रेल्वेरुळावरील दोष शोधणे शक्य झाले आहे. रेल्वे ऊळावरून घसरणे किंवा अपघातास कारणीभूत ठरणारे क्रॅक किंवा दोषांचे निरीक्षण करण्यासाठी ही यंत्रणा वापली जाते. यातून सदोष ट्रॅकची दुरुस्ती केली जाते.

   ट्रॅक मेन्टेनन्सचे यांत्रिकीकरण

ट्रॅक मेन्टेनन्सचे यांत्रिकीकरण करण्यात आले असून यामध्ये ट्रॅक टॅम्पिंग मशीन, बॅलास्ट रेग्युलेटिंग मशीन, डायनॅमिक ट्रॅक स्टॅबिलायझर्स इत्यादीसारख्या मशीन्सचा वापर करून ट्रॅकची देखभाल केली जाते. त्यामुळे मानवी चुका कमी होतात.  इंटरलॉकिंग सिस्टिम पॉईंट्स आणि सिग्नल्स मध्यवर्ती नियंत्रित करण्यासाठीची प्रणाली आहे. मध्यवर्ती स्थानावरून पॉईंट्स आणि सिग्नल ऑपरेट करण्यासाठी इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला जातो. यात मानवी हस्तक्षेप नसल्याने सुरक्षितता वाढते.

                               -संकलन : राजेश मोंडकर, सावंतवाडी

Advertisement
Tags :

.