भारतीय पेप्सिकोचे नेतृत्व जागृत कोटेच्यांकडे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अन्न आणि पेय कंपनी पेप्सिकोने शुक्रवारी भारतात नवीन नेतृत्वाची घोषणा केली. कंपनीने भारतीय व्यवसायाचे नेतृत्व करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून जागृत कोटेचा यांची नियुक्ती केली आहे, तर अहमद अल शेख पश्चिम आशिया व्यवसाय युनिटची जबाबदारी सांभाळतील.
एएमइएसएचे मुख्य वाणिज्य अधिकारी पेप्सिकोने जारी केलेल्या निवेदनानुसार, कोटेचा सध्या आफ्रिका, मध्य-पूर्व आणि दक्षिण आफ्रिकासाठी मुख्य व्यावसायिक अधिकारी आहेत. ते अहमद अल शेख यांची जागा घेतील.
निवेदनानुसार, ‘नेतृत्वातील हा बदल पेप्सिकोच्या दूरदर्शी जागतिक दृष्टीला प्रतिबिंबित करतो. एएमइएसएमधील नेतृत्व बदलाची माहिती गुरुवारी भारतीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
पेप्सिकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (आफ्रिका, पश्चिम आशिया आणि दक्षिण आशिया) यूजीन विलेमसेन म्हणाले की, भारत ही कंपनीसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे, जी आमच्या जागतिक धोरणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
ते म्हणाले की, गेल्या सहा वर्षात अहमद यांनी व्यवसायात परिवर्तन घडवून आणण्यात, नावीन्य आणण्यात आणि आव्हानात्मक परिस्थितीत संघाचे नेतृत्व करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. कोटेचा यांचे स्वागत करताना ते म्हणाले, ‘आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या भारतीय ग्राहकांसोबत यशाची नवीन उंची गाठत राहू.’.