‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ने इंडियन पॅनोरमाचा शुभारंभ
विभागातील 25 चित्रपट, 20 लघुपटांची यादी जाहीर
पणजी : पणजीत 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वात महत्त्वाचा विभाग इंडियन पॅनोरमामध्ये निवडण्यात आलेल्या चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली. ज्यात 25 चित्रपट तर 20 लघुपटांचा समावेश आहे. 384 चित्रपटांतून निवडलेल्या 25 चित्रपटात पाच चित्रपट हे मुख्य प्रवाहातील असून या विभागाचा शुभारंभ गाजलेल्या रणदीप हुडा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने होणार आहे. लघुपट विभागाचा शुभारंभ हर्ष सांगनी दिग्दर्शित ‘घर जैसा कुछ’ लघुपटाने होणार आहे. या विभागात गोमंतकीय ‘सावट’ लघुपटाची निवड झाली आहे. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता आणि पटकथा लेखक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी फीचर फिल्म निवड समितीचे नेतृत्व केले. ज्युरीमध्ये बारा सदस्य आहेत.
पंचवीस चित्रपटांची निवड
इंडियन पॅनोरमाच्या चित्रपट विभागात निवड केलेले 25 चित्रपट पुढील प्रमाणे : रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर, गुऊराज बी यांचा केरेबेटे, सागर पुराणिक यांचा वेंक्या, जादूमोनी दत्ता यांचा जुईफूल, अश्विन कुमार यांचा महावतार नरसिम्हा, कार्तिक सुब्बाराज यांचा जिगर थंडा डबल एक्स, ब्लेसी यांचा आटुजीवीत, आदित्य सुहास जांभळे यांचा आर्टिकल 370, शशी चंद्रकांत खंदारे यांचा जिप्सी, तुषार हिरानंदानी यांचा श्रीकांत, शिबोप्रसाद मुखर्जी यांचा आमार बॉस, ब्रम्हयुगम मल्याळम, 35 चिन्ना कथा काडू तेलुगु, राडोर पाखी आसामी, घरात गणपती, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, रावसाहेब, लेव्हल क्रॉस, कारकेन,भूतपोरी, बंगाली, सौकार्य घोषाल, ओंको की कोथिन, बंगाली, सौरव पालोधी यांची निवड झाली आहे. मुख्य प्रवाहातील सिनेमा विभागात कारखानू, 12वी फेल, मंजुम्मेल बॉईज, स्वर्गरथ, कल्की यांचा समावेश आहे.
वीस लघुपटांचे प्रदर्शन
याशिवाय 262 लघुपटांतून निवडलेले 20 लघुपट इफ्फीमध्ये दाखविण्यात येणार आहेत. लघुपट विभागात गोमंतकीय ’सावट’ लघुपटाची निवड नॉन-फीचर फिल्म ज्युरीमध्ये सहा सदस्य होते. ख्यातनाम माहितीपट आणि वन्यजीव चित्रपट दिग्दर्शक आणि व्ही. शांतराम जीवनगौरव पुरस्कार विजेते सुब्बिया नल्लामुथु यांनी त्याचे नेतृत्व केले. लघुपटांची नावे, दिग्दर्शक, भाषा पुढीलप्रमाणे आहेत.