कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

India-Pakistan : जम्मु-काश्मीरजवळील पाक हल्ल्यात मुंबईचे वीर जवान शहीद

04:41 PM May 09, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

भारतीय सैन्य दलाचे दोन वीर जवान शहीद झाले आहेत

Advertisement

India Pakistan : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानावर एअर स्ट्राईक केला. भारतीय सैन्याने मोठ्या हुशारीने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांना उध्वस्त केलं. यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

Advertisement

या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताने भारताच्या संरक्षण रेषेजवळच्या महत्वाच्या शहरांवर गोळीबार केला. या गोळीबारात काही भारतीय मारले गेल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु यातील बरेच हल्ले हे भारतीय लष्कराने उधळून लावले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना भारतीय सैन्य दलाचे दोन वीर जवान शहीद झाले आहेत.

भारत-पाक सीमारेषेवर अद्याप तणाव सुरु असून पाकिस्तान संभाव्य हल्ल्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहेत. त्यामुळे भारतीय सैन्याने मोठ्या ताकदीने बॉर्डवर उभे आहेत. पाकच्या नापाक कारवायांना उधळून लावताना देशातील दोन जवानांना वीरगती प्राप्त झाली आहे. यामध्ये मुंबईच्या घाटकोपरमधील रहिवाशी आणि मूळचे आंध्र प्रदेशचे मुरली नाईक यांना वीरमरण आले आहे.

भारतीय सैन्याचे दुसरे जवान यांनाही पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. दिनेश शर्मा पॅंछूमध्ये लढताना गोळीबारात जखमी झाले होते. दरम्यान, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशासाठी लढता लढता ते शहीद झाले.

दरम्यान, मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले मुरली नाईक हे मागील मुंबईतील घाटकोपरमध्ये स्थायिक होते. मागील काही दिवसांपूर्वी ते मूळ गावी रहायला गेले होते. जम्मू काश्मीरजवळ पाकिस्तानच्या हल्ल्यात घाटकोपरच्या कामराज नगरमधील रहिवासी मुरली श्रीराम नाईक हे जवान शहीद झाले आहेत.

घाटकोपरमध्ये ते राहत असलेल्या परिसरात बॅनर लावण्यात आले असून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. मुरली नाईक यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावण्यात आले असून त्यांना स्थानिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्वविट करुन शहीद जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Advertisement
Tags :
#jammu and kashmir#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaIndia-Pakistan warINDIAN ARMY
Next Article