कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतवंशीय व्यावसायिकाचा कॅनडामध्ये मारहाणीत मृत्यू

07:00 AM Oct 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ओटावा

Advertisement

कॅनडामधील एका भारतीय वंशाच्या व्यावसायिकाचा वादानंतर मारहाणीत मृत्यू झाला. 109 स्ट्रीट आणि 100 अव्हेन्यूजवळ झालेल्या हल्ल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. हल्ल्यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना 55 वर्षीय आर्वी सिंग सग्गु बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांच्या शरीरावर जीवघेण्या जखमा झाल्या होत्या. हल्ल्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात 40 वर्षीय काइल पापिनला अटक केली असून त्याच्यावर गंभीर हल्ल्याचा आरोप लावला आहे. हल्लेखोर आणि पीडित व्यक्ती एकमेकांना ओळखत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Advertisement

आर्वी सिंग सग्गु आणि त्याची मैत्रीण जेवणानंतर त्यांच्या कारकडे परतत असताना त्यांना त्यांच्या कारवर एक लघवी करणारी व्यक्ती निदर्शनास आली. सदर व्यक्तीला विचारणा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हल्ल्याची घटना घडली. ग्लोबल न्यूजनुसार, आर्वीने त्या माणसाला काय चालले आहे? असे विचारले तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी प्रथम शिवीगाळ केली आणि नंतर बेदम मारहाण केल्यामुळे सुग्गू जमिनीवर पडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article