हूती क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यातून बचावला भारतीय तेलटँकर
06:27 AM Dec 14, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
अमेरिकेने आकाशातच केला ड्रोन नष्ट
Advertisement
सना
Advertisement
इस्रायल-हमास युद्धादरम्यान हूती बंडखोर सातत्याने लाल समुद्रात जहाजांना लक्ष्य करत आहेत. हूती बंडखोरांनी बुधवारी अल-मंडेब सामुद्रधुनीत एका भारतीय तेलटँकरच्या दिशेने 2 क्षेपणास्त्रs डागली आहेत. परंतु या क्षेपणास्त्रांचा निशाणा चुकला आहे. तसेच या टँकरवर सुरक्षा पथक तैनात होते.
हे टँकर मंगळूर येथून सुएज कालव्याच्या दिशेने जात होते. हल्ल्यात कुणीच जखमी झालेला नाही. याचदरम्यान अमेरिकेच्या युद्धनौकेने स्वत:च्या दिशेने येत असलेल्या एका हूती ड्रोनला नष्ट केले आहे. परंतु आतापर्यंत हूती बंडखोरांनी भारतीय तेल टँकरवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
Advertisement
Next Article