भारतीय वनडे संघ दोन तुकड्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय एकदिवशीय संघ 15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय राजधानीतून दोन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये ऑस्टेलियाला रवाना होईल. ज्यात तिकिटांची उपलब्धता अंतिम प्रवासाचे वेळापत्रक निश्चित करेल.
भारत तीन सामन्यांची एकदिवशीय आणि त्यानंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंचा एक गट सकाळी रवाना होईल तर दुसरा गट संध्याकाळी उशिरा रवाना होण्याची शक्यता आहे. हे लांब पल्ल्याच्या विमान प्रवासासाठी बिझनेस क्लास तिकिटांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल. माजी कर्णधार रोहीत शर्मा आणि विराट कोहली, नवनियुक्त उपकर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासह संघ रवाना होण्यापूर्वी नवी दिल्लीत संघात सामील होण्याची अपेक्षा आहे. विराट आणि रोहीत प्रस्थानाच्या दिवशी किंवा एक दिवस आधी राजधानीत पोहोचतील, असे एका जाणकार सुत्राने सांगितले.
संघ पर्थला जाणार आहे, जिथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला एकदिवशीय सामना 19 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. सध्या सुरू असलेले देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय सामने अपेक्षेपेक्षा लवकर संपले तर एकदिवशीय संघात असलेल्या खेळाडूंना दिल्लीत पुन्हा एकत्र येण्यापूर्वी त्यांच्या घरी जाण्यासाठी थोडा ब्रेक दिला जावू शकतो.
भारत 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात सहभागी होणार आहे. एका महत्त्वपूर्ण घडामोडीत, शुभमन गिलला रोहीत शर्माकडून एकदिवशीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याच्या दीर्घकालीन एकदिवशीय भविष्याबद्दलच्या अटकळांना तोंड द्यावे लागत असले तरी रोहीत आणि कोहली दोघांनीही 2027 च्या एकदिवशीय विश्वचषकापर्यंत खेळण्याची इच्छा व्यक्त केल्याचे मानले जाते. मात्र भारत या स्पर्धेपूर्वी तुलनेने कमी 50 षटकांचे सामने खेळणार आहे. दरम्यान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संपूर्ण संघाला राजिंदरनगर येथील त्यांच्या निवासस्थानी जेवणासाठी आमंत्रित केले आहे. जो संघ परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी सौहार्द वाढवण्याचा उद्देश आहे.