कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय पुरुष, महिला कंपाउंड तिरंदाजी संघ अंतिम फेरीत

06:33 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ शांघाय, चीन

Advertisement

भारतीय पुऊष आणि महिला कंपाउंड तिरंदाजी संघांनी बुधवारी येथे दमदार कामगिरी करत विश्वचषक स्तर-2 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि या प्रतिष्ठित स्पर्धेतून देशाला दोन पदके निश्चित केली.

Advertisement

पहिल्या क्रमांकावर असलेल्या ओजस देवतळे, अभिषेक वर्मा आणि ऋषभ यादव यांच्या पुऊष संघाने क्वॉर्टरफायनलमध्ये ग्रेट ब्रिटनचा 239-232 असा सहज पराभव केला आणि नंतर डेन्मार्कच्या मजबूत आव्हानावर 232-231 अशा प्रकारे मात केली.

महिला कंपाउंड विभागात मधुरा धामणगावकर, चिकिथा तनिपार्थी आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांचा समावेश असलेल्या अव्वल क्रमांकाच्या भारतीय संघाने क्वॉर्टरफायनलमध्ये कझाकस्तानचा पराभव केला आणि नंतर उपांत्य फेरीत ब्रिटनचा पराभव करून मेक्सिकोशी जेतेपदाची लढतही निश्चित केली. मेक्सिकोविऊद्धचे दोन्ही सुवर्णपदकाचे सामने शनिवारी होतील.

पुऊषांच्या क्वॉर्टरफायनलमध्ये ब्रिटनविऊद्ध भारताने पहिली मालिका 59-60 ने गमावली, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात संघाने 60-58 असा विजय मिळवला, ज्यामुळे दोन सेटनंतर एकूण गुणसंख्या 119-118 झाली. तिसऱ्या मालिकेत भारतीय त्रिकुटाने आणखी आक्रमक खेळ दाखवत 60-57 असा विजय मिळवला. चौथ्या सेटमध्येही त्यांनी त्याच फरकाने विजय मिळवला आणि अजय स्कॉट, अॅडम कारपेंटर आणि ल्यूक डेव्हिस या ब्रिटनच्या त्रिकुटाविऊद्ध सात गुणांनी विजय मिळवला.

उपांत्य फेरीत, भारताची सुरुवात चुकीची राहून त्यांनी पहिली मालिका 57-60 ने गमावली आणि दुसऱ्या सामन्यात 58-58 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये डेन्मार्कने 118-115 असा तीन गुणांनी आघाडी घेतल्याने भारतासाठी परिस्थिती कठीण दिसत होती. पण एक उल्लेखनीय बदल घडताना भारतीय त्रिकुटाने अचूक लक्ष्यभेद केले, तर डॅनिश तिरंदाज मॅथियास फुलरटन, मार्टिन डॅम्बो आणि निकलस ब्रेडल ब्राइडल हे अपयशी ठरले आणि भारताने 175-175 अशी बरोबरी साधली. निर्णायक चौथ्या मालिकेत भारताने आश्चर्यकारकरीत्या 57-56 अशी एक गुणाची आघाडी घेतली आणि अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.

महिला कंपाऊंड विभागात पहिल्या फेरीत बाय मिळालेल्या भारताने आठव्या क्रमांकाच्या कझाकस्तानला 232-229 असे पराभूत केले, तर चौथ्या क्रमांकाच्या ब्रिटनला 232-230 असे पराभूत करून जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मेक्सिकोविऊद्ध जेतेपदाची लढत निश्चित केली. गेल्या महिन्यात ऑबर्नडेल, अमेरिका येथे ज्योती सुरेखा वेन्नम आणि ऋषभ यादव यांचा समावेश असलेल्या भारतीय कंपाऊंड मिश्र संघाने विश्वचषक स्तर-1 मध्ये त्यांचे चिनी तैपेई प्रतिस्पर्धी हुआंग आय-जो आणि चेन चिह-लुन यांना पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article