For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय पुरुष हॉकी संघाचा इंग्लंडवर विजय

06:29 AM Feb 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीय पुरुष हॉकी संघाचा इंग्लंडवर विजय
Advertisement

एफआयएच हॉकी प्रो लीग : 2-1 फरकाने मात, हरमनप्रीत सिंगचे दोन गोल

Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

भारताच्या पुरुष हॉकी संघाने एफआयएच हॉकी प्रो लीगच्या भुवनेश्वरमधील टप्याची सांगता विजयाने करताना इंग्लंडवर 2-1 अशा गोलफरकाने मात केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन्ही गोल नोंदवले. हरमनप्रीतने आघाडीवर राहून 26 व 33 व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताला महत्त्वाचा विजय मिळवून दिला. या विजयानंतर गुणतक्त्यात भारतीय संघाने तिसरे स्थान मिळविले आहे. इंग्लंडने पहिल्या टप्प्यातील सामन्यात भारतावर 3-2 असा विजय मिळविला होता, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला होता. पण सुरुवातीला त्यांना संधी निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. भारताने मात्र सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण अवलंबले, पण अचूकता नसल्याने पहिल्या सत्रात त्यांना यश मिळू शकले नाही. दुसऱ्या सत्रातील पाचव्या मिनिटाला अभिषेकने अप्रतिम स्टिकवर्कचे दर्शन घडवित तीन डिफेंडर्सनला हुलकावणी देत शानदार क्रॉस पास दिला. मात्र सुखजीत सिंगला अगदी जवळ असूनही या संधीचा लाभ घेता आला नाही.Indian men's hockey team wins over England

Advertisement

अभिषेकला लवकरच आणखी एक संधी मिळाली. पण त्याने ड्रॅग केलेला फटका खूप वाईड गेला. जेकब पेटनवर फाऊल केल्याने 24 व्या मिनिटाला जुगराज सिंगला पिवळे कार्ड मिळाल्याने भारताला धक्का बसला. त्यामुळे काही वेळ भारताला दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. तरीही भारताने आक्रमण चालूच ठेवले आणि 26 व्या मिनिटाला हार्दिक सिंगच्या कौशल्यामुळे भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर हरमनप्रीतने जोरदार फटका लगावत गोल नोंदवला. हरमनप्रीतने पेटनवर फाऊल केल्याने इंग्लंडलाही 30 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. त्यावर कर्णधार कॉनर विल्यम्सनने अचूक गोल नोंदवत भारताशी बरोबरी साधली.

33 व्या मिनिटाला भारताने पुन्हा एकदा आघाडी घेतली. हरमनप्रीतने हा गोल नोदवत सामन्यातील दुसरा गोल केला. इंग्लंडने प्रतिआक्रमणात भारतावर जबरदस्त दबाव आणला, भारताचा भक्कम बचाव त्यांना भेदता आला नाही. शेवटच्या सत्रातही भारताने बचाव भक्कम ठेवत इंग्लंडला यश मिळू दिले नाही. तीन मिनिटे असताना इंग्लंडने गोलरक्षकाला हटवून आऊटफिल्डमध्ये जादा खेळाडू घेतला. पण भारताचा बचाव त्यांना भेदता आला नाही आणि हा सामना यजमानांनी 2-1 असा जिंकला.

Advertisement
Tags :

.