महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय पुरुष हॉकी संघाचा पराभव

06:08 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अँटवर्प (बेल्जियम)

Advertisement

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लिग हॉकी स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात विद्यमान ऑलिम्पिक विजेता आणि यजमान बेल्जियमने भारतीय पुरुष हॉकी संघाचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते.

Advertisement

जागतिक हॉकी मानांकनात सहाव्या स्थानावरील भारतीय संघाने या सामन्यात दर्जेदार खेळ करत निर्धारित वेळेपर्यंत बलाढ्या बेल्जियमला बरोबरीत रोखले होते. पण पेनल्टी शुटआऊटमध्ये बेल्जियमने भारतावर 3-1 मात केली. या सामन्यात बेल्जियमला बोनस गुणासह एकूण दोन गुण मिळाले तर भारताला केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले.

सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर 11 व्या मिनिटाला भारताचे खाते अरजित सिंग हुंडालने मैदानी गोलवर उघडले. मध्यंतराला केवळ काही सेकंद बाकी असताना फेलिक्स डिनेरने बेल्जियमला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून बरोबरी साधून दिली. मध्यंतरावेळी दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्यातील 50 व्या मिनिटाला फ्लोरेंट ऑबेलने पेनल्टी कॉर्नरवर बेल्जियमचा दुसरा गोल केला. बेल्जियमला ही आघाडी फार वेळ राखता आली नाही. 57 व्या मिनिटाला सुखजित सिंगने मैदानी गोल करून भारताला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेनंतर पंचांनी पेनल्टी शुटआऊटचा अवलंब करत सामना निकाली केला. पेनल्टी शुटआऊटमध्ये भारतातर्फे सुखजित सिंगने एकमेव गोल नोंदवला तर विवेकसागर प्रसाद, अभिषेक आणि हुंडाल यांना गोल नोंदवता आले नाहीत. बेल्जियमतर्फे विलियम घिसलेन, फ्लोरेंट ऑबेल आणि बोकार्ड यांनी गोल केले तर बेल्जियमच्या आर्थर डी स्लोवरचा फटका भारतीय गोलरक्षकाने थोपाविला.

या स्पर्धेतील गेल्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात बेल्जियमने भारताचा 4-1 असा पराभव केला होता तर गेल्या बुधवारच्या सामन्यात हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने अर्जेंटिनाचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 5-4 अशा गोलफरकाने पराभव केला होता. आता या स्पर्धेत भारताचा पुढील सामना अर्जेंटिनाबरोबर रविवारी उशिरा खेळविला जात आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article