महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय पुरुषांची अर्जेंटिनावर शूटआऊटमध्ये मात

06:06 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय महिला संघाचा मात्र अर्जेंटिनाकडून 5-0 ने धुव्वा

Advertisement

वृत्तसंस्था/ अँटवर्प (बेल्जियम)

Advertisement

भारताची बुधवारी येथे एफआयएच प्रो लीगच्या युरोपियन टप्प्यातील मोहिमेला संमिश्र पद्धतीने सुऊवात झाली. भारतीय पुऊषांनी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा 5-4 असा पराभव केला. त्यापूर्वी दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत राहिले. नियमित वेळेत भारताकडून मनदीप सिंग (11 वे मिनिट) आणि ललित कुमार उपाध्याय यांनी दोन गोल केले, तर अर्जेंटिनाला लुकास मार्टिनेझ (20 वे मिनिट) आणि थॉमस डोमेने (60 वे मिनिट) यांनी पेनल्टी कॉर्नरवर यश मिळवून दिले.

शूटआऊटमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि सुखजिंत सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर अन्य एक गोल अभिषेकने केला. पूर्वार्धात भारत आणि अर्जेंटिना यांच्यात चुरशीची लढत झाली. जागतिक क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर असलेल्या भारताचे पहिल्या सत्रात वर्चस्व राहिले, तर पुढील 15 मिनिटांत अर्जेन्टिनाचे पारडे जड राहिले.

महिला संघ पराभूत

दुसरीकडे, भारतीय महिलांना मात्र अर्जेंटिनाकडून 0-5 असा अपमानास्पद पराभव पत्करावा लागला. ज्युलिएटा जानकुनास (53 वे, 59वे मिनिट) हिने दोन गोल केले, तर आगुस्तिना गोर्झेलनी (13 वे मिनिट), व्हॅलेंटिना रापोसो (24 वे मिनिट) आणि व्हिक्टोरिया मिरांडा (41 वे मिनिट) यांनी अर्जेंटिनासाठी गोल केले. नवीन प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला सामना खेळत असलेल्या भारतीय महिला या सूर हरवल्याप्रमाणे दिसल्या आणि पहिल्या दोन सत्रांत प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात त्यांना धोकादायक प्रवेशही करता आला नाही. आश्चर्यकारक बाब म्हणजे भारताची माजी कर्णधार आणि अनुभवी गोलरक्षक सविता पुनिया हिला संघात नाव समाविष्ट असूनही शेवटी वगळण्यात आले आणि बिचूदेवी खरीबम हिने गोलरक्षण केले.

अर्जेन्टिना संघ अधिक कल्पक आणि धोकादायक दिसला. पहिल्या दोन सत्रांमध्ये त्यांनी तब्बल सात पेनल्टी कॉर्नर मिळविले. चौथ्या मिनिटाला अर्जेंटिनाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यानंतर एका मिनिटाने दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण गोल करण्यात अपयश आले. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात सातत्याने प्रवेश करत व अथक आक्रमण करत भारतीय बचावफळीवर दबाव कायम ठेवला. भारतीय महिलांचा पुढील सामना आज गुऊवारी यजमान बेल्जियमशी, तर पुरुष संघाचा शुक्रवारी बेल्जियमशी होणार आहे.,

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article