For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत भारतीयाला आठ वर्षांचा तुरुंगवास

06:26 AM Jan 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत भारतीयाला आठ वर्षांचा तुरुंगवास
Advertisement

व्हाईट हाऊसवर ट्रक हल्ल्याचा प्रयत्न : बायडेन होते टार्गेटवर

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेतील व्हाईट हाऊसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भारतीय नागरिक साई वर्षित कंदुलाला शुक्रवारी 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. कंदुलाने 22 मे 2023 रोजी भाड्याने घेतलेल्या ट्रकचा वापर करून हल्ल्याचा कट रचला होता. त्याला 13 मे 2024 रोजी अमेरिकेच्या मालमत्तेचे जाणूनबुजून नुकसान केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना मारण्याचा आपला इरादा होता अशी कबुली दिली होती. तसेच या हल्ल्यासाठी 6 महिन्यांपासून आपले नियोजन सुरू होते असेही त्याने स्पष्ट केले होते. भारतातील चंदननगर येथे जन्मलेले कंदुला हा अमेरिकेचा कायमस्वरुपी रहिवासी असून त्याच्याकडे ग्रीन कार्ड होते.

Advertisement

न्याय विभागाच्या मते, या हल्ल्याचा उद्देश अमेरिकेतील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार उलथवून टाकणे आणि नाझी विचारसरणीने प्रेरित हुकूमशाही प्रस्थापित करणे हा होता. न्यायालयीन कागदपत्रांनुसार कंदुला 22 मे 2023 रोजी सेंट लुईसहून विमानाने वॉशिंग्टनला पोहोचला. डलेस विमानतळावर संध्याकाळी 5:20 वाजता उतरल्यानंतर, त्याने 6:30 वाजता एक ट्रक भाड्याने घेतल्यानंतर त्याने जेवण केले आणि ट्रकमध्ये इंधन भरले. यानंतर कंदुला वॉशिंग्टन डीसीकडे निघाला. रात्री 9:34 वाजता त्याने ट्रक व्हाईट हाऊस आणि प्रेसिडेंट्स पार्कच्या संरक्षणासाठी असलेल्या बॅरियरमध्ये धडकवला. याचदरम्यान ट्रक बंद पडल्यामुळे त्याचा हल्ल्याचा प्रयत्न फसला होता. अमेरिकन गुप्तचर सेवेच्या अधिकाऱ्यांनी कंदुलाला घटनास्थळीच अटक केल्यानंतर पुढील तपास पूर्ण करून त्याला आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.