महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचे नेतृत्व आमीर अलीकडे

06:42 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

मलेशियात 19 ऑक्टोबपासून सुरु होणाऱ्या सुल्तान ऑफ जोहोर चषक कनिष्ठांच्या हॉकी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 18 सदस्यांच्या भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचे नेतृत्व आमीर अलीकडे सोपविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारताचा माजी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशचे प्रशिक्षक क्षेत्रात या स्पर्धेद्वारे पदार्पण होणार आहे.

Advertisement

मलेशियात होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना 19 ऑक्टोबरला जपान बरोबर खेळविला जाईल. त्यानंतर भारताचा दुसरा सामना 20 ऑक्टोबरला ब्रिटनबरोबर, तिसरा सामना 22 ऑक्टोबरला यजमान मलेशियाबरोबर, चौथा सामना 23 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाबरोबर तर पाचवा सामना 25 ऑक्टोबरला न्यूझीलंड बरोबर होणार आहे. या स्पर्धेत आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेतील अंतिम सामना 26 ऑक्टोबरला खेळविला जाईल. बचाव फळीत खेळणाऱ्या अमीर अलीकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून आघाडी फळीतील गुरज्योत सिंग याची कामगिरी निर्णायक ठरू शकेल. चीनमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत जेतेपद मिळविणाऱ्या भारतीय वरिष्ठ हॉकी संघामध्ये गुरज्योत सिंगचा समावेश होता. बचाव फळीत खेळणारा संजय दुखापतीने जायबंदी झाल्याने त्याच्या जागी आमीर अलीला संधी देण्यात आली आहे.

मलेशियात होणारी सुल्तान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धा ही 2024 च्या नोव्हेंबरमध्ये मस्कत येथे होणाऱ्या पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेच्या दृष्टीकोनातून भारतीय संघाला महत्त्वाची असून त्यांची या स्पर्धेत सत्त्वपरीक्षा ठरेल. भारतीय संघाचे उपकर्णधारपद रोहितकडे सोपविण्यात आले आहे. पी. आर. श्रीजेशने हॉकी क्षेत्रातून निवृत्ती पत्करल्यानंतर प्रशिक्षक क्षेत्रात प्रवेश केला असून त्यांच्या प्रशिक्षक कार्यकाल या स्पर्धेने प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी बेंगळूरमध्ये खास सरावाचे शिबिर आयोजित केले आहे.

भारतीय कनिष्ठ हॉकी संघ : गोलरक्षक : विक्रमजीत सिंग, अली खान, बचावफळी : आमीर अली (कर्णधार), पी. तालेम, शारदानंद तिवारी, सुखविंदर, अनमोल एक्का, रोहित (उपकर्णधार), मध्यफळी : अंकित पाल, मनमीत सिंग, रोशन कुजूर, मुकेश टोप्पो, चंदन यादव, आघाडी फळी : गुरज्योत सिंग, सौरभ कुशावाह, दिलराज सिंग, अर्शदीप सिंग, मोहम्मद कोनेन दाद.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article