भारतीय कनिष्ठ फुटबॉल संघ जाहीर
06:13 AM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / अहमदाबाद
Advertisement
2026 च्या एएफसी 17 वर्षांखालील वयोगटातील पुरूषांच्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक पात्र फेरी फुटबॉल स्पर्धेसाठी प्रमुख प्रशिक्षक फर्नांडीसने 23 सदस्यांचा भारतीय कनिष्ठ फुटबॉल संघ जाहीर केला.
या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पॅलेस्टिनीबरोबर 22 नोव्हेंबरला, चीन तैपेईबरोबर 26 नोव्हेंबरला तर लेबेनॉनबरोबर 28 नोव्हेंबर आणि इराणबरोबर 30 नोव्हेंबरला होणार आहे. पुढील वर्षी सौदी अरेबियात होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी या पात्रफेरीतील गट विजेते संघ पात्र ठरतील. तसेच 17 वर्षांखालील वयोगटातील फिफाची आगामी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कतारमध्ये पुढील वर्षी भरविली जाणार आहे.
Advertisement
Advertisement